राज ठाकरेंच्या 'उत्तरसभे'ला ठाण्याच्या पोलिसांकडून दणका ; मनसे ठाम

पोलिसांनी परवानगी दिली नाही तर परवानगी शिवाय आम्ही सभा तिथेच घेऊ..
raj thackeray
raj thackeraysarkarnama
Published on
Updated on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची उद्या (ता.९) ठाण्यात होणाऱ्या सभेला ठाण्याच्या पोलिसांनी (thane police) परवानगी नाकारली आहे. रस्त्यात होणारा अडथळा आणि वाहतूक कोडींचं कारण देत ठाणे पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे.

ही सभा उद्या (ता 9) ठाणे येथील गडकरी रंगायतनजवळ सायंकाळी 6.30 वाजता होणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र त्याचठिकाणी सभा घेण्याचा आग्रह धरला आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर परवानगी शिवाय आम्ही सभा तिथेच घेऊ असे त्यांनी सांगितले आहे.

raj thackeray
MNS:राज ठाकरे 'उत्तरसभे'त काय बोलणार ; संदीप देशपांडेंनी दिलं उत्तर..

मनसेने ही सभा ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवर आयोजित केली होती. परंतू रस्त्यात होणारा अडथळा आणि वाहतूक कोडींचं कारण देत या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. अन्य ठिकाणी बंदिस्त सभागृहात किंवा खुल्या मैदानावर सभा घ्या, अशी सूचना पोलिसांनी मनसेला दिल्या आहेत.

या सभेला ठरलेल्या जागी परवानगी देण्यात यावी, यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर आज ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण ठरेल असं समजते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करीत यासभेविषयी माहिती दिली होती.

raj thackeray
वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

या व्हिडिओमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, ''शिवतीर्थावर झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अनेकांना मिरच्या झोंबल्या. पण काहींनी त्यावरुन अनेक समज-गैरसमज करुन घेतले. त्यामुळे ठाणे येथे होणारी सभा ही एका अर्थाने 'उत्तरसभा' असणार नाही. आपल्या परंपरेत कोणतीही एखादी मोठी पूजा घातली की त्यानंतर उत्तरपूजा केली जाते. तशीच आता शिवाजी पार्क मैदानावरील राज ठाकरे यांच्या सभेनंतर ठाणे येथे 'उत्तरसभा' घेतली जाईल,''

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यामध्येही याबाबत मतभेद आहेत. पु्ण्यात राज ठाकरे यांचा हा आदेश त्यांच्याच कट्टर समर्थकाने धुडकावून लावला आहे.

मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ''सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे म्हणाले. गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com