Ambadas Danve News : शिवसेना सोडण्याची चर्चा अन्..! बाळासाहेबांच्या फोटोसमोर अंबादास दानवेंनी घेतली शपथ

Shiv Sena News : अंबादास दानवे हे शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

संजय परब

Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यामुळे शिवसेनेत अस्वस्थ वातावरण असताना दानवे यांनी या चर्चेला आधीच पूर्णविराम दिला आहे. मंत्रालयासमोरील दानवे यांच्या बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. या फोटोसमोर उभे राहून दानवे म्हणाले, ‘मी साहेबांसमोर उभा आहे. वंदनीय बाळासाहेब यांची शपथ घेऊन सांगतो की मी शिवसेना सोडणार नाही,’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Ambadas Danve News)

मराठवाड्यात ठाकरे शिवसेनेची (Shiv Sena) ताकद कायम राखून ठेवण्यासाठी दानवे जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र, तेच पक्ष सोडून जाणार म्हटल्यावर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थ वातावरण आहे. दानवे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्यामुळे ते सध्या संभाजीनगरला आपल्या घरी मुक्कामाला असून, आज सकाळपासून ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने ते स्वतःच अस्वस्थ झाले आहेत. “मी याबाबत कोणाला स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडणार नाही. मी काल शिवसेनेत होतो, आज शिवसेनेत आहे आणि उद्यासुद्धा शिवसेनेत असेन”, असे त्यांनी सांगितले आहे.

Ambadas Danve
NCP Ajit Pawar : राज्यात 'महाभूकंप' होणार! शरद पवार गटासह काँग्रेस हादरणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते शिवसेना असा सामाजिक आणि राजकीय प्रवास करणारे दानवे गेले दोन एक दशके शिवसेनेत असून, एक आक्रमक आणि निष्ठावंत नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीत ऑगस्ट 2022 ला दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले. यानंतर त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर ठाकरे शिवसेनेचा किल्ला लढवत ठेवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांना भाजपकडून पक्ष प्रवेशाच्या ऑफर येत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर आता भाजपने काँग्रेस फोडायला घेतली असून, प्रमुख नेते अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन झाल्यावर आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अंबादास दानवे यांना फोडून आपल्या पक्षात घेण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. “होय, मलासुद्धा भाजपकडून ऑफर आहे. गेले काही दिवस भाजपचे नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांना आता विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा नाही. पण, आम्ही असे प्रलोभनाला बळी पडणारे नाही”, अशी स्पष्ट भूमिका दानवे यांनी मांडली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी दानवे यांना जालना मतदारसंघामधून उतरवण्याच्या विचार ठाकरे शिवसेना करत आहे. मात्र, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरोधात उभे राहण्यास दानवे फारसे तयार नाहीत. त्यांना संभाजीनगर शहरमधून उभे राहण्याची इच्छा आहे. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना ही जागा हवी आहे. यामुळे सध्या या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण, शेवटी मातोश्रीचा आदेश मानून पुढे जाणारा मी कार्यकर्ता आहे, अशी भूमिका दानवे यांनी घेतली आहे.

(Edited By - Rajanand More)

R

Ambadas Danve
MVA Meeting : 'मविआ'ची उद्याची बैठक रद्द; 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपाचा फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com