Rohit Pawar News : रोहित पवारांच्या अडचणी वाढणार ? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ 'बारामती ॲग्रो'वरून पुन्हा आक्रमक

Baramati Agro News : महाराष्ट्र प्रदूषण मंडळ बारामती अॅग्रो कंपनीवरून पुन्हा एकदा आक्रमक...
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथे असलेल्या 'बारामती ॲग्रो'च्या 'डिस्टलरी प्लांट'ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली होती. तसेच नोटिशीनंतर 72 तासांतच हा प्लांट बंद करण्याचे आदेशही दिले होते. या आदेशानंतर राजकीय वातावरण तापले होते.

यानंतर कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या 'बारामती ॲग्रो'च्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत प्रदूषण मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने 'बारामती ॲग्रो'च्या प्लांटवर कारवाईला स्थगिती दिली होती, पण आता पुन्हा एकदा रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने बारामती अॅग्रो कंपनी (Baramati Agro)वरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. यात मंडळाने रोहित पवारांची याचिका फेटाळून लावा, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला अहवाल हायकोर्टात शुक्रवारच्या सुनावणीत सादर केला आहे.

बारामती अॅग्रो कंपनीने पर्यावरण नियमावलीचं उल्लंघन केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केला आहे. याचवेळी बारामती अॅग्रो कंपनीनं हरित लवादाकडे दाद मागणे गरजेचे होते, असेही मंडळाने नमूद केले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 6 ऑक्टोबरपर्यंत वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

बारामती अॅग्रो कंपनीच्या अहवालावर युक्तिवाद होणार...

उच्च न्यायालयात पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवारांची (Rohit Pawar) याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी 16 ऑक्टोबरपर्यंत पवार यांना न्यायालयाने दिलासा कायम आहे. तूर्तास 72 तासांच्या नोटिशीला न्यायालयानं दिलेली स्थगितीही कायम ठेवण्यात आली आहे. आता 16 ऑक्टोबरला बारामती अॅग्रो कंपनीचा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अहवालावर युक्तिवाद होणार आहे.

काय आहे प्रकरण...?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथे असलेल्या 'बारामती ॲग्रो'च्या 'डिस्टलरी प्लांट'ला नोटीस बजावली होती.तसेच पुढील 72 तासांत हा प्लांट बंद करण्याचे आदेशही नोटिशीद्वारे दिले होते. या आदेशानंतर राजकीय वातावरण तापले होते.या नोटिशीनंतर रोहित यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत प्रदूषण मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली होती.यावर न्यायालयाने 'बारामती ॲग्रो'च्या प्लांटवर कारवाईला स्थगिती दिली होती. (Maharashtra Pollution Control Board)

त्या दोन नेत्यांची नावे लवकरच जाहीर करणार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर झालेल्या कारवाई राजकीय सूडभावनेतून केली आहे. या कारवाईसाठी राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्या दोन नेत्यांचे नावे लवकरच जाहीर करणार आहे, पण जे लोक काचेच्या घरात राहतात. त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. वेळ प्रत्येकावर येते, असा इशाराही त्यांनी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com