Free Ration Scheme: मोफत रेशन योजना बंद होणार? केंद्र सरकारकडून स्वस्त गहू-तांदूळ विक्रीवर बंदी

Modi Govt Decision, Will Free Ration Scheme be Discontinued?: केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Free Ration News :
Free Ration News :Sakarnama
Published on
Updated on

Free Ration News : केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून (Central Govt) राज्यांना मिळणारा गहू आणि तांदूळ बंद होणार असून मोफत रेशन बंद होण्याची शक्यता आहे.

सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळाची विक्री थांबवण्यात आली आहे. कर्नाटकसह देशातील काही राज्यांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळाने (FCI) जारी केलेल्या आदेशानसार राज्य सरकारांना ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे. (National Politics)

Free Ration News :
Nashik Kumbhmela : छगन भुजबळांचे राज्य सरकारला साकडं; सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत केली मोठी मागणी

कर्नाटकने या योजने अंतर्गत जुलै महिन्यासाठी तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने 13,819 टन तांदळाची मागणी केली होती. पण कर्नाटक ला आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पण दुसरीकडे OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्यांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी 3,400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री सुरू राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हंटले आहे. (Political news)

बाजारातील किमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार भारतीय अन्न महामंडळ ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्रीय पूल स्टॉकमधून (Ration Card) तांदूळाची विक्री करणार आहे. 12 जूनला केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी तांदूळ गव्हाची विक्री करण्याची घोषणा केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com