
Chhagan Bhujbal to State Governmnet : सन २०२६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अवघ्या दोन-अडीच वर्षांवर येवून ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापासून तयारी केली तरच कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला साकडे घालून विविध मागणी केली आहे.
याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, "२०२६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अवघ्या दोन-अडीच वर्षांवर येवून ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे. नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महानगरपालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. त्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता आहे." (Latest Marathi News)
भुजबळांनी भूसंपादनाचे नियोजन करण्याची सूचनाही यावेळी केली. ते म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्वाचा प्रश्न साधुग्राम आणि अन्य विकास कामांसाठी भूसंपादनाचा असतो. यासाठी आतापासून नियोजन केले तरच भूसंपादन करून त्या ठिकाणी कामे करता येतील."
दर्जेदार कामांसाठी आतापासूनच कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी केली. भुजबळ म्हणाले, "सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केली तर त्या कामांना दर्जा राहत नाही. विकासकामे दर्जेदार आणि दिर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमर्यादेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची लवकरात लवकर घोषणा करावी."
राज्य आणि केंद्र सरकारकडून (Central Government) मिळणाऱ्या निधीबाबत अहवाल तयार करावा, असेही भुजबळ यांनी यावेळी सूचवले. ते म्हणाले, "सिंहस्थ आराखड्यातील विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. राज्य व केंद्रशासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही तातडीने व्हावी."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.