Third front in Maharashtra : महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार? 14 राजकीय पक्षांनी केली चाचपणी !

Third Political front in Maharashtra : शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरा जावे. प्रागतिक पक्षांच्या संयुक्त बैठकीत 14 पक्षांचा निर्णय..
Third front in Maharashtra
Third front in Maharashtra Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी 2024 ची निवडणूक लढवताना तिची दिशा कशी असावी? त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तिसरा राजकीय पर्याय जनतेला द्यावा का ? या आणि अशा अनेक विषयांवर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्रातील 14 राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. (Latest Marathi News)

या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप बोलत होते. या बैठकीला आमदार जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी , कॉ.रेगे , नाथाभाऊ शेवाळे, प्रताप भोगडे यासह अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Third Politiacal front in Maharashtra)

Third front in Maharashtra
Radhakrushna Vikhe News : राऊतांपाठोपाठ अंबादास दानवेंच्या डोक्यावर परिणाम; राधाकृष्ण विखेंनी डिवचलं!

आज प्रमुख राजकीय पक्षांकडून समाजामध्ये जाती आणि धार्मिक विषयावरून विष पेरण्याचे व तरुणांचे डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे, कष्टकर्यांचे, सर्वसामान्य माणसाच्या जगण्या - मरण्याचे मुद्दे बाजूला पडतात व भावनिक मुद्द्यांवर राजकारण चालते. या सगळ्या गोष्टींना दूर सारून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्नांवर रान पेटून आपण 2024 ची निवडणूक लढवावी. असे यावेळी संदीप जगताप यांनी केले. स्वाभिमानीचे संदीप उफाडे देखील उपस्थित होते.

Third front in Maharashtra
Ganesh Sugar Factory: गणेश साखर कारखान्याच्या निकालावर राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, लोकशाहीत....

यावेळी संदीप जगताप म्हणाले, "स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सातत्याने शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्याच बाजूने लढत आलेली आहे. जातीय, धार्मिक विषयाला आम्ही कधी थारा दिला नाही. भावनिक मुद्द्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या जगण्याच्या मुद्द्यांवर 25 वर्ष राजू शेट्टींनी संघर्ष केला आहे. 2024 ची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना मुद्द्यांवर लढवणार आणि त्यात आम्ही यशस्वी होणार.याची आम्हाला खात्री आहे. या वाटेने महाराष्ट्रातील जे छोटे मोठे राजकीय पक्ष चालत असतील तर आम्ही हातात हात घालून काम करू, असे आजच्या प्रागतिक पक्षांच्या बैठकीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com