Abu Azami On Vande Mataram
Abu Azami On Vande Mataram Sarkarnama

Abu Azami On Vande Mataram: 'वंदे मातरम्' म्हणणार नाही, इस्लामची परवानगी नाही'; आझमींच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक

Abu Azami Refuse to Say Vande Mataram: "आमच्या आईसमोरही आम्ही माथा टेकवत नाही."
Published on

Monsoon Session Day 3: राज्य पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरू आहे. विधानसभा सभागृहात चांगलाच गदारोळ माजला.समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून आज सभागृहात जोरदार घमासान घडून आले, आम्ही 'वंदे मातरम् ' ही घोषणा देऊच शकत नाही, असे आझमींनी वक्तव्य करताच सभागृहातलं वातवरण पेटले.

Abu Azami On Vande Mataram
Deputy CM : 'या' राज्यात आहेत चक्क 'पाच' उपमुख्यमंत्री ?

लक्षवेधीचा मुद्दा मांडताना आझमी म्हणाले, "आफताब नावाचा एक गुन्हेगार होता, ज्याने एका तरूणीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलं. यानंतर देशभरात मुस्लिमांच्या विरोधात रोष तयार झाला. हिंदू समाजाचे आक्रोश मोर्चा निघू लागल्या. या मोर्चात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला. २९ मार्चला संध्याकाळी ५ वाजता, तीन लोक मोटारसायकलवरून आले. औरंगाबादच्या राममंदिरापाशी तीन व्यक्ती आले. तिथे त्यांनी घोषणा दिली की, 'इस देश में पहना होगा तो वंदे मातरम रहना होगा.' आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही, कारण आम्ही एका अल्लाहला मानतो. जगात आम्ही दुसरीकडे कुठेही माथा टेकवू शकत नाही. आमच्या आईसमोरही आम्ही माथा टेकवत नाही. आमचं धर्म या कृतीची परवानगी देत नाही."

अबू आझमींच्या वक्तव्यामुळे सभागृहात त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, इतर सदस्यांनी गदारोळ माजवला. यामुळे सभागृहाचे वातावरणात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळलेले वातावरण निवळण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी प्रयत्न केला. यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याला उत्तर दिले.

Abu Azami On Vande Mataram
BJP District President News : नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर आमदार बोर्डीकरांची पकड मजबूत..

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माझी सन्माननीय सदस्य अबू आझमी यांना विनंती आहे की, या देशातल्या कोट्यवधी लोकांची 'वंदे मातरम् ' या भावनेवर श्रद्धा आहे. आझमींनी केलेले वक्तव्य बरोबर नाही. मला सांगा असा कोणता धर्म सांगतो की, आपल्या आईला सन्मान करू नका. वंदे मातरम कोणतेही धर्मगीत नाही. ते आपले आपले राष्ट्रगान आहे. तुमची भावना योग्य नाही," अशा शब्दात फडणवीसांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com