Nawab Malik NCP : यास्मिन पाळत प्रकरणात नवाब मलिकांच्या अहवालासाठी न्यायालयाची पोलिसांना नोटीस

Andheri Court Notice to Police on Yasmeen Wankhede Complaint Against NCP Leader Nawab Malik : अंधेरी न्यायालयात 2021 मध्ये यास्मिन यांनी तक्रार दाखल केली होती. नंतर ती वांद्रे इथल्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती.
Nawab Malik NCP
Nawab Malik NCPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai court on Yasmeen complaint : केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध बदनामी आणि पाळत ठेवल्याचा आरोप आहे.

या आरोपांप्रकरणी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी अहवाल का सादर केला नाही, अशी विचारणा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने केली आहे. यासाठी अंबोली पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अंधेरी न्यायालयात 2021 मध्ये यास्मिन यांनी तक्रार दाखल केली होती. नंतर ती वांद्रे इथल्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. वानखेडे यांच्या बहिणीने राष्ट्रवादीचे (NCP) नवाब मलिक यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची जानेवारी महिन्यात न्यायालयाने दखल घेतली होती.

याप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 202अंतर्गत अंबोली पोलिसांना (Police) आरोपांच्या चौकशीचा आदेश देऊन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता; परंतु पोलिसांनी अद्याप हा अहवाल सादर केला नाही. त्यामुळे वांद्रे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आशीष आवारी यांनी पोलिसांना अहवाल सादर का केला नाही, अशी विचारणा करून कारणे दाखवा नोटीस बजावली.

Nawab Malik NCP
Badlapur Firing : भाजप आमदार कथोरे घरासमोरील गोळीबारामागे शिवसेनेचा पदाधिकारी; जखमीच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'एक्स' आणि विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना आपल्याविरुद्ध खोटे, बदनामीकारक आरोप केल्याचा दावा यास्मिन यांनी तक्रारीत केला होता. मलिक यांनी बदनामी केल्याच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोही तक्रारीसह जोडल्या आहेत.

Nawab Malik NCP
Marathi Vijay Melava live updates: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वी मनसैनिक ताब्यात; दादर पोलिसांची कारवाई

या फोटोमध्ये आपण एका अमली पदार्थ विक्रेत्यासह असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. प्रत्यक्षात ती व्यक्ती अमली पदार्थविक्रेता नसून आणि फोटोशी छेडछाड केल्याचा दावा यास्मिन यांनी केला होता. याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात आपण पोलिसांत अनेकदा तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे यास्मिन यांनी तक्रारीत म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com