Yogi Adityanath : आपल्या राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावी, यासाठी मुंबईत दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) महाराष्ट्रातीलअनेक उद्योजकांची भेट घेतली. आदित्यनाथ हे तब्बल पाच लाख कोटीं रूपयांची गुंतवणूक (Investment) आपल्या राज्यासाठीघेऊन गेले. आता उत्तर प्रदेशात रिलायन्स, अदानी, टाटा व इतर ही अनेक उद्योग संस्थांनी गुंतवणूकीसाठी तयारी असल्याचे योगींना सांगितले. ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये महाराष्ट्रातील उद्योजकांना योगींनी निमंत्रण दिले आहे. या ठिकाणी उद्योगांबाबत काही करार होणार असल्याचे समजते.
रिलायन्स इंडस्ट्री समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणि ग्रीन लाईट सेक्टरमध्ये गुंतवणुकीसाठी योगींपुढे प्रस्ताव दिला. आगामी काळात उत्तर प्रदेशात 5G इंटरनेट सेवा पुरवणे, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच््या साहा्य्याने उत्तर प्रदेशातील गावांत दर्जेदार आरोग्याच्या सेवा पुरविणे असा प्रस्ताव आहे. अदानी समूह सार्वजनिक-खासगी अशा दुहेरी पद्धतीने मेडिकल कॉलेज सुरू करणार आहे. नोएडा भागात जवळरास 10 हजार तरूणांसाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना होणार आहे.
रिलायन्स, टाटा सन्स, अदानी, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आणि रामकी यांच्यासह तब्बल दोन डझनहूनही जास्त अधिक उद्योजकांनी योगींची भेट घेतली.
अदानी समूह करणार गुंतवणूक :
अदानी उद्याग समूहाचे करण अदानी यांच्याकडून वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक सेक्टरमध्ये गुंतवणुकीबाबत चर्चा केली. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी सिमेंटचेकारखाने सुरू होतील, अशी चर्चा झाली. अदानीकडून बलिया जिल्हा आणि श्रावस्ती या ठिकाणी पीपीपी पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालचा प्रस्ताव दिला आहे.
बिर्ला समूह उभारणार कन्व्हेन्शन सेंटर :
बिर्ला समूहाकडून कुमार मंगलम बिर्ला यांनीही योंगींना सहकार्य मागितले आहे. नोएडा येथे कन्व्हेन्शन सेंटर उभे करण्याच त्यांचा मानस आहे. हे कन्व्हेन्शन सेंटर जगाभरातील एक मोठे कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक असेल असेही त्यांनी सांगितले. फूड प्रोसेसिंग, डेटा सेंटर्स, वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक तसेच सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी बिर्लांनी रस दाखवला.
टाटा समूहाने काय आश्वासन दिले?
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही योगींशी चर्चा केली. उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आघाडीवर त्यांना चर्चा झाली. ते म्हणाले की, एअर इंडियाची सेवेची विमानसेवा उत्तर प्रदेशातल्या विमानतळांवर उपलब्ध केले जाईल. तसेच, आध्यात्मिक प्रस्थ असलेल्या सगळ्या ठिकाणी हॉटेल्स निर्माण केले जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.