Yuva Sena : युवा सेनेच्या नियुक्त्यांवरून ठाकरे गटात नाराजीनाट्य!

Yuva Sena : ठाकरे गटातील बड्या नेत्यांच्या मुलांना डावलले.
Yuva Sena Shivsena Aditya Thackeray
Yuva Sena Shivsena Aditya ThackeraySarkarnama

Yuva Sena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधील युवा सेनेच्या नियुक्त्यांवरून आता नाराजीनाट्य पाहायला मिळतय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत अडचणीच्या काळातही एकनिष्ठ राहिलेल्या प्रमुख नेत्यांच्या मुलांनाच युवा सेनेत स्थान देण्यात आले नाही, संधी देण्यात आले नाही, यामुळे आता ठाकरे गटामध्ये नाराजीनाट्याचा नवा अंक सुरू झाल्याचे, बोलले जात आहे.

Yuva Sena Shivsena Aditya Thackeray
High Court News : महाविकास अघाडीच्या काळातील विकास कामे रद्द करु नका..

शिवसेनेसोबत पूर्वीपासून आता अडचणीच्या काळातही एकनिष्ठ राहिलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मुलांनाच ठाकरेंच्या युवा सेनेमध्ये स्थान देण्यात आलेले नाही, यामुळे ठाकरे गटात अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे.

आजच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर करणयात आले होते. यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत अडचणीच्या काळातही सोबत राहिले अशा नेत्यांची मुलांना महत्वाची पदे मिळतील अशी शक्यता होती. मात्र असे झाले नाही. ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांना - मुलींना यामध्ये डावलण्यात आलं. आता याबद्द्ल नाराजी व्यक्त होतंय, असे बोललं जातंय.

Yuva Sena Shivsena Aditya Thackeray
Voter List : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी जाहीर : तब्बल ४० लाख डुप्लिकेट मतदार, अनेकांना यादीतून वगळले!

युवा सेनेमध्ये विक्रांत जाधव, निलेश महाले, सिद्धेश धाऊसकर, हर्षल काकडे, धनश्री कोलगे या पाच जणांना युवा सेनेत नव्याने संधी देण्यात आली आहे. मात्र राजन विचारे यांची मुलगी धनश्री विचारे, चंद्रतकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे, आमदार सुनिल शिंदे यांचे पुत्र सिद्धेश शिंदे, अतुल सरपोतदार यांचे पुत्र जय सरपोतदार यांना मात्र संधी देण्यात आली नाही. म्हणूनच आता ठाकरे गटात नाराजी उफाळून आली असल्याचे बोलेले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com