MLA Residence News : आमदार निवासात विनापरवाना राहत होता तरूण; पोलिसांनी गुन्हा केला दाखल !

living in MLA residence without permission : मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Abhijeet Vanjari
Abhijeet Vanjari Sarkarnama

Mumbai News : आमदारांना राहण्यासाठी दिलेल्या खोलीत एक तरूण अनधिकृत वास्तव्य करत असलेल्या तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अभिजीत वंजारी यांना शासनाकडून देण्यात आलेल्या खोलीमध्ये परवानगीशिवाय अनधिकृतपणे राहणाऱ्या नागपूरमधील हर्षल हजारे या तरूणावर आता मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Abhijeet Vanjari
Solapur Politic's : ॲक्टिव्ह कोठे अन्‌ अस्वस्थ काडादी सोलापूर भाजपच्या गडाला लावणार सुरुंग

आमदार अभिजित वंजारी यांचे स्वीय सहाय्यक विजय रामचंद्र गाळे (वय 53वर्षे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आता पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालय येथे आकाशवाणी आमदार निवासात वंजारी यांना १०६ क्रमाकांची रूम देण्यात आली होती. या आमदार निवासात आमदारांकडे आलेले कार्यकर्ते त्यांच्या सहमतीने या खोलीत काहीकाळ राहतात.

आमदारांरांच्या याच खोलीमध्ये हर्षल हजारे राहत होता. हजारेला जवळपास सहा महिन्यांपूर्वी या खोलीत राहण्याची परवानगी दिली होती. त्यांचा राहण्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. १६ जून रोजी अभिजीत वंजारी यांचे नागपूर मधील आणखी एक स्वीय साहाय्यक अजिंक्य पवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ जून ते २५ जूनपर्यंत एकूण ६ जणांना या खोलीत राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

Abhijeet Vanjari
ED Action In Mumbai : 'ईडी' कथित कोविड घोटाळ्याची पाळेमुळे खोदणार? अधिकाऱ्यांवर आजही कारवाई सुरूच..

१९ जून या दिवशी आमदार निवासाबाबत चौकशी करताच, ही घटना समोर आली. हजारे हा आमदारांच्या खोलीत राहत असल्याचे निदर्शनास आले. परवानगी शिवाय आता तुला राहता येणार नाही, असे सांगताच हजारेंनी गोळे यांना विरोध केला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध तक्रार दिली गेली. त्यानुसार गुन्हा नोंदवून, पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com