Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी हत्येच्या तपासात अनेक 'अँगल' बेदखल; नाराज माजी आमदार पुन्हा CM फडणवीसांना भेटणार

Zeeshan Siddique CM Devendra Fadnavis senior police officers Mumbai Police chargesheet Baba Siddiqui murder case : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासात अन् दोषारोपत्रात वगळण्यात आलेल्या अनेक मुद्यांवर झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली.
Zeeshan Siddique
Zeeshan Siddique Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतच्या पोलिसांच्या चार्जशीटवर माजी आमदार झिशान सिद्दिकींनी नाराजी व्यक्त केली.

"या चार्जशीटमध्ये बिल्डर लॉबी, 'एसआरए' अँगल बाहेर आलेला नाही. अनेक प्रश्न उपस्थित राहत असून, ते अनुत्तरीत दिसतात. त्यामुळे संपूर्ण चार्जशीट वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची लवकरच भेट घेणार आहे", असे झिशान सिद्दिकी यांनी सांगितले.

मुंबई (Mumbai) पोलिसांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत चार्जशीट तयार केले आहे. यात अनेक अँगल दिसत नाही. त्यामुळे या चार्जशीटवर समाधानी नाही, असे म्हणत माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच झिशान सिद्दिकी यांनी काही महत्त्वाचे प्रश्न आणि अँगल देखील उपस्थित केले आहेत.

Zeeshan Siddique
Manoj Jarange And Anjali Damania : बीड प्रकरण उचलून धरणाऱ्या दमानिया अन् जरांगेंच्या अडचणी मुंडे समर्थकांनी वाढवल्या; आता 'या' शहरात गुन्हा दाखल

बिष्णोईने हे हत्याकांड घडवून आणले असेल, तर त्याने गुन्ह्याची (Crime) कबुली दिलीय का? तो कोठे आहे? हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बिष्णोईच्या चौकशीत त्याने कुठल्या बिल्डरने हे हत्याकांड करण्यास सांगितले नाही, असं काही म्हटलंय का? या प्रश्नांची उत्तरे चार्जशीटमध्ये मिळत नाही. तसेच हे माझे प्रश्न देखील पोलिसांना आहेत, असे झिशान सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

Zeeshan Siddique
India GDP Data 2025 : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंताजनक अपडेट; GDP चार वर्षांची नीचांकी पातळी गाठणार

गंभीर मुद्याकडे वेधलं लक्ष

झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाकडे देखील लक्ष वेधले. त्यात बिल्डर लॉबीवर संशय व्यक्त केला आहे. तपासात हा गंभीर मुद्यावर उत्तर मिळालं पाहिजे. बिष्णोई हा जेलमध्ये आहे. तसं झालं नाही तर, पुढं काहीही झालं, तरी बिष्णोईच्या नावावर खपवले जाईल, अशी भीती देखील व्यक्त केली.

सीएम फडणवीस यांना भेटणार

या हत्या प्रकरणाच्या चौकशीवर आम्ही समाधानी नाहीत. आमदाराची हत्या झाली आहे. लोकप्रतिनिधीची हत्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक अँगलने याचा तपास होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेणार आहे. कायदेशीर बाबीही तपासून घेणार आहोत. वेळप्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ. आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका झिशान सिद्दिकी यांनी मांडताना तपासावर पुन्हा नाराजी व्यक्त केली.

सलमानचा गंभीर मुद्दा वगळला

या हत्याकांडात एक महत्त्वाच्या अँगलकडे झिशान सिद्दिकींनी लक्ष वेधले. सलमानला घाबरवण्यासाठी हे घडवले गेले असं अनमोल बिष्णोईने पोलिसांना सांगितले का? तसंच मुख्य आरोपी अजून सापडले नाहीत. मग तुम्ही कशाप्रकारे तपास केला आणि कोणता निष्कर्ष लावला आहे? घटना होऊन इतके महिने झाले, तरी मुख्य आरोपी सापडलेला नाही. कायदा सुव्यवस्था मुंबईत बिघडली आहे, असा गंभीर आरोप देखील झिशान सिद्दिकी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com