
New Delhi : भारतीय अर्थव्यवस्था मंदगतीने पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीचे आकडे प्रसिध्द केले. त्यानुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.4 टक्के राहण्याचा पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा दर मागील चार वर्षांतील नीचांकी आहे. मागील आर्थिक वर्षात हा दर 8.2 टक्के एवढा होता. त्यामुळे जीडीपीमध्ये वेगाने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (एनएसओ) ने ही आकडेवारी प्रसिधद् केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात जीडीपी 6.6 टक्क्यांनी वाढीचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारी समोर आलेले आकडे आरबीआयच्या अंदाजपेक्षा कमी आहेत. कोरोना महामारीनंतर चार वर्षांत पहिल्यांदाच जीडीपी वाढीचा दर एवढा कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. हा अनेक प्रमुख क्षेत्रांमधील मंदीचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कृषी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी 1.4 टक्क्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्रात या आर्थिक वर्षात 3.8 टक्क्यांपर्यंत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. इतर काही क्षेत्रांमध्ये मात्र उत्पादनात तीव्र घसरण होण्याचा अंदाज आहे. बांधकाम क्षेत्रात 8.6 टक्के तर वित्तीय सेवा, रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये वाढीचा दर 7.3 टक्के राहू शकतो.
कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी एक प्रतिक असते. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत, असा जीडीपीचा अर्थ. जीडीपीचा दर वाढला तर आर्थिक प्रगती वाढली आणि जीडीपी दर घटला तर देशाची आर्थिक प्रगती खालावली, असे म्हणता येईल.
जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरते. ही आकडेवारी दर तिमाहीला प्रसिध्द केली जाते. देशांतर्गत उत्पादन आणि सेवांचा त्यासाठी विचार केला जातो. प्रामुख्याने कृषी, उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्रांतील उत्पादनावर जीडीपीचा दर ठरवला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.