काय सांगता! आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स...नागरिकांनी केलं ट्रोल...

KDMC : महानगरपालिकेचे दुर्दैव म्हणावे लागेल ती जन्मालाच अमावस्येच्या दिवशी आली आहे.
KDMC News
KDMC News Sarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचा (KDMC) वर्धापन दिन शनिवारी (ता.१ ऑक्टोबर ) साजरा झाला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर नृत्य केले. एकीकडे शहरात वाहतूक कोंडी, झाडे, कमानी कोसळण्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे पालिका प्रशासकीय अधिकारी नृत्यात तल्लीन असल्याने समाज माध्यमावर नागरिकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान, नृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून नागरिक समस्यांनी त्रस्त, राजकीय पदाधिकारी उत्सवांत व्यस्त आणि प्रशासकीय अधिकारी मस्त, अशी चर्चा शहरात रंगली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांसह मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रशासन अधिकाऱ्यांचे हे वर्तन योग्य नसल्याची टीका केली आहे. (KDMC News )

KDMC News
आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील शिवसेनेचे ५०० कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शनिवारी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कल्याणमधील आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर एक आनंद म्हणून झिंगाट गाण्याच्या ठेक्यावर अधिकाऱ्यांनी नृत्य केले.

या अधिकाऱ्यांसोबत पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांची पावले देखील झिंगाट च्या गाण्यावर थिरकली. आनंद व्यक्त करणे हे गैर नाही, परंतू शहरात एककीडे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तीव्र आहे, उत्सवांनिमित्त उभारण्यात आलेल्या कमानी, झाडे वाऱ्यामुळे पडून दुर्घटना घडल्या असताना त्याकडे लक्ष न देता अधिकारी कार्यक्रमात, नृत्यात दंग असल्याने नागरिकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष नवरात्रीत गरबा उत्सवात तर प्रशासकीय अधिकाऱी कार्यक्रमात व्यस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कोणालाही काही देणे घेणे नाही यावरुन नागरिकांनी नागरिक आणि सत्ताधाऱ्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना सोडली तर सर्वच राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या वर्तनावर झोड उठवली आहे.

KDMC News
लोणावळ्याला जमलं ते श्रीमंत पिंपरी-चिंचवडला करता आले नाही...

वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाचणे हे किती संयुक्तिक आहे. असे काही घडले असेल तर मी याविषयी आयुक्तांशी चर्चा करेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने देशातील तिसरे व राज्यातील पहिले शहर म्हणून मान मिळवल्याचा आनंद साजरा करताना आपले केडीएमसीचे अधिकारी असे ट्विट करत आमदार पाटील यांनी नृत्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

महानगरपालिकेचे दुर्दैव म्हणावे लागेल ती जन्मालाच अमावस्येच्या दिवशी आली आहे. या शहराविषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आस्था नाही, ते केवळ तीन वर्षे काम करतात निघून जातात. रस्ते, पाण्याची समस्या आज शहरात तीव्र आहे. या अधिकाऱ्यांनी स्वतः शहरात फिरुन समस्या पाहीली पाहीजे पण ते केबिनमध्ये बसून असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुंबड्या पोहोचवून त्यांनी समाधान केले असावे. यामुळे ते ही खूश आहेत. अधिकाऱ्यांनी प्राथमिक सोयीसुविधा व्यवस्थित कराव्या, तुमच्या सोबत आम्ही देखील नाचायला तयार आहोत. पण हे न करता ते जर केवळ नाचत असतील तर आमचे हे दुर्दैव आहे आम्हाला,असे अधिकारी लाभले आहेत, अशा शब्दात मनसे जिल्हा अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी टीका केली आहे.

दरम्यान, महानगरपालिकेचे अधिकारी आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना हा अधिकार नाही का की त्यांनी आपला आनंद वर्धापन दिनी व्यक्त करावा? ट्रोल करणारे कशावर देखील ट्रोल करतात. खड्डे बुजविणे, रस्त्यांची कामे, शहर स्वच्छतेची आमची कामे सुरुच आहेत. खड्डे दरवर्षी पडतात, पावसामुळे या कामांत व्यत्यय येतो, पण काम करत आहोत. पालिका प्रशासनासह शहरात सर्वत्र हा दिवस आनंदात साजरा होणे आवश्यक आहे. हा दिवस आनंदात साजरा झाला तर यात ट्रोल करण्यासारखे काय आहे, असे मत आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com