आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील शिवसेनेचे ५०० कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Eknath Shinde, Aditya Thackeray Latest News
Eknath Shinde, Aditya Thackeray Latest Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ४० आमदार, १२ खासदार यांसह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण झाली आहे. गोष्ट येथेच थांबली नसून शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच आणि पक्षचिन्हावर देखील दावा केला आहे. यामुळे हा वाद आता निवडणूक आयोगात प्रलंबित आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघालाच सुरूंग लावण्यात आला असून वरळीतील शिवसेनेच्या ५०० कार्यकर्त्यांना शिंदे यांनी गळाला लावले आहे. यामुळे हा आदित्य यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Eknath Shinde, Aditya Thackeray Latest News
शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजप युवा मोर्चाचा नेता गळाला...

शिवसेना आणि शिंदे गटात प्रत्येक गोष्टीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामध्ये दसरा मेळावा, दही हंडी असो किंवा दुर्गा पुजा यामध्ये दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. याबरोबरच रोजच दोन्ही गटात रोजच पक्षप्रवेश होत आहेत. शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेला रोजच सुरूंग लावला जात असून आज तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या ५०० कार्यकर्त्यांना शिंदे यांनी गळाला लावले आहे. यामुळे हा आदित्य यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Eknath Shinde, Aditya Thackeray Latest News
धक्कादायक! फुटबॉल सामन्यादरम्यान फॅन्समध्ये हाणामारी; १२७ जणांचा झाला मृत्यू

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील कोळीवाड्यातील ५०० कार्यकर्ते हे आज शिंदे गटात प्रवेश करत असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी 'वर्षा' बंगल्यावर पोचले आहेत. या प्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यामुळे ते यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com