नगर : नगर जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र पक्ष सोडणार नसल्याची भुमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ससाणे यांच्या भुमिकेमुळे काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने हा राजीनामा देण्यात आला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान 'साईबाबांच्या झोळीत हात घालणा-याचे कधीच चांगले झाले नाही,' असे वकतव्य केले होते. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज होते. त्यामुळे समर्थक कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका याआधीच जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाक्ष्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पूर्वीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाणे यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काल ससाणे समर्थकांचा मेळावा घेतला होता. तर आज शिर्डी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर ससाणे यांनी राजीनामा दिला. करण ससाणे यांचे वडील दिवगंत आमदार कै. जयंत ससाणे साईबाबा संस्थानचे सात वर्षे अध्यक्ष होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.