नगराध्यक्ष पत्नीसह मनोहर पोटे पुन्हा भाजपात

भाजप सोडताना पोटे यांनी नेते ठरवलेले भोस यांनाही आज सोडून देत पुन्हा भाजपात दाखल झाले.
नगराध्यक्ष पत्नीसह मनोहर पोटे पुन्हा भाजपात

श्रीगोंदे (नगर) : नऊ महिन्यांपूर्वी पालिका निवडणुकीच्या तोंडावर  भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे आज त्यांच्या नगराध्यक्ष पत्नीसह पुन्हा भाजपात डेरेदाखल झाले. दोन नगरसेवक वगळता इतर सगळे भाजपात आल्याने पालिका पुन्हा एकदा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात आली.

काल काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश केला. आज तोच कित्ता गिरवत नगराध्यक्ष शुभांगी पोटे त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे व इतर सहा नगरसेवकांनी आज पाचपुते यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे दोन नगरसेवकांचा समावेश आहे.  

नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी पोटे यांनी पाचपुते यांना सोडून ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यासमवेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या व पाचपुते गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे वाद झाले होते. प्रचारात खालच्या पातळीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले, मात्र सगळे झाले गेले सगळे विसरून आज पोटे व पाचपुते समर्थकांची गळाभेट झाली. भाजप सोडताना पोटे यांनी नेते ठरवलेले भोस यांनाही आज सोडून देत पुन्हा भाजपात दाखल झाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com