नगर :जामखेडमधील गुन्हेगारी फोफावण्यास तालुक्यातील राजकीय गॉडफादर जबाबदार आहे. तालमीच्या माध्यमातून गुंडांना आश्रय दिला जात आहे. ही तालीम उद्धवस्त करावी. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या आशिर्वादाने दहशत बोकाळली असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून हद्दपारीच्या नोटीसा देवून अडकविण्याचा प्रयत्न होतो. हा भेदभाव का केला जातो, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी उपस्थित केला आहे.
जामखेड येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणी मराठा मोर्चातील कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी भोर यांनी प्रशासन भेदभाव करीत आहे, राजकीय आश्रयाखाली पोसलेल्या गुंडांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप केला. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदने देऊन उपस्थित कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मोर्चाप्रसंगी भोर म्हणाले, की जामखेडमधील हत्याकांडाला दहा दिवस उलटून गेले, तरीही पोलिसांना याप्रकरणाच्या मुळाशी जाता आले नाही. या कटाचे मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. याप्रकरणी मराठा समाज व सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. अशाही स्थितीत संबंधित पिडित कुटुंबिय पोलिस व प्रशासनाला संयमाची भूमिका घेत सहकार्य करीत आहेत.
या गुन्ह्याचा तपास चांगल्या अधिकाऱ्यांकडे सोपवून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जावा. त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी मोर्चाच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.