नगरमधील राष्ट्रवादीच्या त्या १८ नगरसेवकांना दया नाहीच : जयंत पाटील

नगरमधील राष्ट्रवादीच्या त्या १८ नगरसेवकांना दया नाहीच : जयंत पाटील

नगर : महापालिकेच्या महापाैर-उपमहापाैर निवडीदरम्यान भाजपच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या त्या १८ नगरसेवकांना दया दाखविली जाणार नाही. एकदा कागदावर केलेली कारवाई मागे घेतली जात नाही, असे सांगून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या नगरसेवकांना दया दाखविली नाही. 

राष्ट्रवादी भवनात आज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. तत्पूर्वी पक्षाने निलंबित केलेल्या नगरसेवकांनी पाटील यांची भेट घेतली. बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्याबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले, की संबंधित नगरसेवकांची भेट नियोजित नव्हती. त्यांना निलंबित केले असल्याने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नव्हता, मात्र ते पक्षाच्या कार्यालयात आले. त्यामुळे त्यांचे म्हणणे एेकून घेतले. त्यांनी वेळेत म्हणणे सादर केले नसल्याने पक्षाने कारवाई केल्याचे त्यांना सांगण्यात आले.

भाजपच्या वळचणीला कुणी जावू नये, हे पक्षाने तोंडी सांगितले होते. ते जर वरिष्ठ नेत्यांचे एेकत नसतील, तर त्यांना दया दाखविण्याचे कारण नाही. त्यांना परत पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

व्हीप काढला नव्हता

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारास मदत करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्याबाबत पक्षाने व्हीप काढला नव्हता. मात्र शहराध्यक्षांनी याबाबत वरिष्ठांना वेळीच कळविणे आवश्यक होते. त्यांनी ते केल्याने त्यांचीही हकालपट्टी केली आहे. नगरसेवकांचे कृत्य तर कारवाईस पात्र होतेच. आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत कारवाईचा प्रश्न येत नव्हता, कारण ते या प्रक्रियेत अधिकृतपणे कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com