श्रीगोंदे : राज्यातील अनेक तरुण नेते विधानसभेला उभे राहण्यासाठी मागेपुढे करीत होते. राहुरीचे मंत्री प्राजक्त तनपुरे हेही त्यातच होते. श्रीगोंद्याची जागा असेच `व्हय नाय, `व्हय नाय` करीत राहुल जगताप यांनी हातची घालवली अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
कर्जत मधील एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी नेहमीच्या शैलीत या तरुण नेत्यांना चांगलेच सुनावले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने श्रीगोंदा मतदारसंघातून घन:श्याम शेलार यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर केली. एक महिना अगोदर त्यांनी कामाला सुरुवात केली असती तर तेही आमदार झाले असते, असे सांगत पवार यांनी शेलारांच्या पराभवाचे विश्लेषण केले.
ते म्हणाले, ``श्रीगोंद्यात तत्कालीन आमदार राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवारी घेण्याबाबत सारखे मागेपुढे करीत होते. त्यांचे वडील असते तर त्यांना उमेदवारी करावीच लागली असती. कारण त्यांचे वडील अशा बाबतीत खूप धाडसी होते. ते धाडसाने निर्णय घेत होते. मात्र आजचे तरुण मुले धाडस दाखविण्यात का कमी पडतात हे समजत नाही. मंत्री प्राजक्त तनपुरे हेही विधानसभा लढण्यायबाबत साशंक होते 'दादा उभे राहू का ? नाही थांबतोच' असे सारखे बोलत होते.``
राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यासाठी अनेकजण मागेपुढे करीत होते. सगळ्यांची नाव घेत नाही. परंतु तरुण मुलांनी धाडसाने उभे राहणे गरजेचे आहे. रोहित पवार पुण्यातून कर्जतला आले आणि कर्जत जामखेडच्या मतदारांनी त्यांना जिंकून दिले. रोहितसारखे धाडस सगळ्यांनीच केले पाहिजे, असे सांगायला ते विसरले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.