महापौर सुरेखा कदम यांचे पती कोतवाली पोलिसांना शरण 

 महापौर सुरेखा कदम यांचे पती कोतवाली पोलिसांना शरण
महापौर सुरेखा कदम यांचे पती कोतवाली पोलिसांना शरण
Published on: 
Updated on: 

नगर : केडगाव येथील दगडफेकप्रकरणी गुन्हे दाखल असलेले शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांच्यासह शिवसेनेचे 11 जण आज पोलिसांना शरण आले. कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आली. 

केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळीच रास्ता रोको करीत दगडफेक केली. दगडफेक, गाड्यांची मोडतोड, मृतदेहाची विटंबना या कारणांनी शिवसेनेच्या सुमारे पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आली. त्यामध्ये माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. यापूर्वीही शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना शरण येत अटक करवून घेतली होती. आज संभाजी कदम यांच्यास विशाल वालकर, सचिन शिंदे, आशा निंबाळकर, सागर थोरात आदींचा अकराजणांमध्ये समावेश आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.