MNS-BJP Alliance : भाजप कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार? मनसे-भाजप युतीवर काँग्रेसची टीका

Atul Londhe On Raj Thackeray BJP Alliance : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात राजधानी दिल्ली येथे युतीबाबत बैठक सुरु आहे.
Atul Londhe, Raj Thackeray-BJP
Atul Londhe, Raj Thackeray-BJP Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray-BJP Alliance : मनसे-भाजप युतीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा (Raj Thackeray and Amit Shah) यांच्यात राजधानी दिल्ली येथे युतीबाबत बैठक देखील सुरु आहे. या बैठकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित आहेत. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? याकडे महायुतीसह महाविकास आघाडीचंही लक्ष लागलेलं आहे.

मनसे-भाजप युतीच्या हालचाली सुरु होताच विरोधकांनी या युतीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपने मनसेसोबत (BJP-MNS) युती करुन उत्तर भारतीय बांधवांचा विश्वासघात केल्याचं म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोंढे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे?  भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे.” या ट्विटच्या माध्यमातून लोंढे यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या घटनेची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे.

“भाजपची मनसेशी युती, उद्धव ठाकरेंची ताकद कळाली असेल...”

दरम्यान, आता भाजपला शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गट आणि काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही मनसेशी युती करावी लागत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) ताकद किती होती? हे भाजपला कळालं असेल असं वक्तव्य ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केलं आहे.

Atul Londhe, Raj Thackeray-BJP
उद्धव ठाकरेंची ताकद किती? हे भाजपला कळलंय; म्हणून ते मनसेला सोबत घेताहेत!

राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीत मनसेला किती जागा दिल्या जाणार?  महायुतीत मनसेचं स्थान काय असणार आणि मनसे सत्तेत असणार की नाही?  याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

(Edited By - Jagdish Patil)

Atul Londhe, Raj Thackeray-BJP
Raj Thackeray Alliance BJP: राज ठाकरे सोबत डीलसाठी फडणवीस का नाहीत? विनोद तावडेंसोबत अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com