Sujay Vikhe : नगर जिल्ह्यात येणार मोठे उद्योग; जमीन 'एमआयडीसी'कडे वर्ग करण्याचा मार्ग मोकळा

Winter Session 2023 : वडगाव गुप्ता येथील 'एमआयडीसी'च्या कामास खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश.
sujay vikhe
sujay vikhe Sarakarnama
Published on
Updated on

Nagar News : शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू होता. या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तरूणांना रोजगाराची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार जागेबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी पुढाकार घेतला होता. अखेर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्याचा मार्ग मंत्रिमंडळाच्या मंजुरीने मोकळा झाला असून भविष्यात नगर जिल्ह्यात येणार मोठे उद्योग येणार असल्याने रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

sujay vikhe
Shivsena: 'गल्लीबोळातील नेत्या' म्हणणाऱ्या फरांदेंना अंधारेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाची जमीन

नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीकरिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.

या बाबतीत मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील ६०० एकर म्हणजेच सुमारे २२५ हेक्टर आर जमीन फेज २ साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खासगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

मोठे उद्योग जिल्ह्यात येणार

राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र, राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली.

औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी पाठपुरावा

औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान, जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

(Edited by- Sachin waghmare)

sujay vikhe
राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीने नगर-मनमाड रस्त्याच्या कामात मागितली टक्केवारी : डॉ. सुजय विखे पाटील

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com