...म्हणे गुरुद्वाराच्या लाऊडस्पिकरमुळे झाला मायग्रेन, शीख बांधवांत संतापाची लाट !

कुणाच्या खोडसाळपणामुळे पोलिसांनी एखाद्या धार्मिक स्थळाला नोटीस देण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. आता पुढे काय पाऊल उचलायचे आहे, ते आम्ही समाजाच्या वरिष्ठांशी बोलून ठरवणार आहो, असे शीख बांधवांनी सांगितले.
Gurudwara Khamgaon
Gurudwara Khamgaon

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव Khamgaon of Buldana District येथे आयकर विभागाने Income Tax Department पोलिसांत एक अजब तक्रार केली आहे. आयकर कार्यालयासमोरील गुरुद्वारामध्ये दिवसभर लाऊडस्पिकर सुरू असतो. त्यावर दिवसभर भजन आणि गाणी सुरू असतात. त्यामुळे आयकर कार्यालयातील कर्मचारी मायग्रेन या आजाराने ग्रासले आहेत. या तक्रारीमुळे खामगावसह जिल्ह्यातील शीख बांधवांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. Wave of anger among shikh brothers.

तक्रारीनुसार गुरुद्वाराच्या लाऊडस्पिकरमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतोय आणि कर्मचाऱ्यांना मायग्रेनचा त्रास होत आहे. नाराज झालेल्या शीख बांधवांनी या तक्रारीचा निषेध केला आहे. आमच्या भावना दुखावल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. खामगाव शहर पोलिसांनी तात्काळ या गुरुद्वाराला एक नोटीस देऊन यावर कारवाई करण्यासाठी गुरुद्वाराला सांगितले आहे. यामुळे मात्र खामगावसह जिल्ह्यातील शीख समुदायात खळबळ उडाली आहे. शीख बांधव याचा निषेध करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा गुरुद्वारा स्वातंत्र्यापूर्वी  1944 साली स्थापन झाला आहे, तर आयकर कार्यालय 2000 साली सुरू झाले.

याबाबत आयकर अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ध्वनिक्षेपकापासून होणाऱ्या त्रासाबद्दल व केलेल्या तक्रारीबद्दल विचारले असता त्यांनी  बोलण्यास नकार दिला. तर तक्रारकर्त्या आयकर अधिकारी वृंदा जोग यांच्याकडे दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता, त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना त्रास होतो म्हणून आम्ही पोलिसांना कळवले असल्याचे सांगितले. खामगाव शहर पोलिसांनीही यावर बोलण्यास नकार दिला आहे. पण येथील गुरुद्वाराला पत्र देऊन योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तक्रारींमुळे जिल्ह्यातील शीख समुदायात कमालीची नाराजी बघायला मिळत आहे.

खामगाव शहरात शीख समाजाचे हे धार्मिक स्थान सर्व सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर राहते. प्रत्येकाच्या सुखदुःखांमध्ये शीख समाज नेहमीच योगदान देत आला आहे. गुरुद्वारामध्ये सकाळी व सायंकाळी धार्मिक कार्यक्रम होतात. याची तक्रार आयकर विभागाने पोलिसांकडे केली आहे. त्यावरून पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवून आवाजाबाबत सूचना केली आहे. या बाबीचा शीख समाजबांधवांनी निषेध केला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर यासंदर्भात आमच्यासोबत चर्चा केली असती, तर प्रकरण सामंजस्याने मिटले असेही समाजाचे म्हणणे आहे. 

त्यांनी परस्पर तक्रार दिल्यानंतरही आम्ही स्वतः अधिकाऱ्यांना भेटलो आणि समजावून सांगितले. आमचे म्हणणे त्यांनाही पटले. त्यावर आपण पुन्हा या तक्रारीचा विचार करू, असे त्यांनी सांगितले. सन १९४४ पासून गुरुद्वारा आहे. पण आजपर्यंत अशी तक्रार कुणी केली नाही. आयकरभवन येथे सन २००० मध्ये उभारण्यात आले. पण या कार्यालयातीलही कुणी अशी तक्रार गेल्या २० वर्षांत केली नाही. पण आता काही अधिकाऱ्यांनी गुरुद्वाराची तक्रार केली आहे. कुणाच्या खोडसाळपणामुळे पोलिसांनी एखाद्या धार्मिक स्थळाला नोटीस देण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. आता पुढे काय पाऊल उचलायचे आहे, ते आम्ही समाजाच्या वरिष्ठांशी बोलून ठरवणार आहो, असे शीख बांधवांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com