उद्धव ठाकरे-फडणवीस भेटीवर सुळेंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झालाय, असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला. ठाकरे-फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे, याकडे लक्ष वेधले असता महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण २५ वर्षे या राज्याची सेवा करेल
Supriya Sule
Supriya Sule
Published on: 
Updated on: 

नागपूर : महाराष्ट्रात वेगवेगळ्या विचारसरणीतील पक्षांचे लोक निवडणूक आणी राजकारण बाजूला ठेवून एकमेकांशी चांगले संबंध ठेवत असतील, तर त्याचे स्वागत आहे. कारण ज्यांचे संस्कार माझ्यावर झाले, ते यशवंतराव चव्हाण. Yashwantrao Chavan त्यांचे सर्वच राजकीय पक्षांतील लोकांशी चांगले संबंध होते. त्यामुळे आमचे वागणेही तसेच आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस The Chief Minister Uddhav Thackeray and Devendra Fadanvis यांची बंदद्वार भेट झाली. त्यावर मी इन्स्टंट काही बोलणार नाही. कारण माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही, तर वास्तव आहे, असे खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंदद्वार भेटीवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आल्या असता त्या विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या. मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडा वेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. 

सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असे त्या म्हणाल्या. भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. नारायण राणे यांनी अनिल परब यांना ईडीची धमकी दिली आहे, याकडे लक्ष वेधले असता ईडीच्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करते, असे श्रीमती सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झालाय, असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला. ठाकरे-फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे, याकडे लक्ष वेधले असता महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण २५ वर्षे या राज्याची सेवा करेल, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रत्येकाला पक्ष वाढीचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com