Navneet Rana : बच्चू कडूंनी स्वत:वर नियंत्रण राखावं : राणांनी दिला सल्ला

Navneet Rana : स्टेजवर आम्ही नेते असतो तेव्हा सतरंजी उचलणारा हा कार्यकर्ता असतो. त्याचा मानसन्मान राखा.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama

नागपूर : आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यावर जाहीरपणे हात उगारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामुळे कडू यांच्यावर विविध स्तरातून टीकाही होत होती. आता याच मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कडू यांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, "बच्चू कडू यांचा राग आणि नियंत्रण हातातून बाहेर जात आहे, ते स्पष्टपणे लोकांना दिसतं. त्यांचं नियंत्रण सुटलेलं दिसून येत आहे. आपल्याच कार्यकर्त्यांच्या मारहाणीच्या व्हिज्युअल्स प्रकरणातून हे स्पष्ट झालं आहे. नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, कार्यकर्तेच नेत्यांना बनवत असतात. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने जाहीर मारहाण करणं, हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे."

Navneet Rana
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचे पोस्टर्स फाडले, 'भारत जोडो' ला गालबोट ; कॉंग्रेस आक्रमक

बच्चू कडू यांनी आपण मारहाण केली नाही, असे म्हटले आहे. मारहाणीबाबत त्यांनी नकार दिला असला तरी व्हिडीओ व्हिज्युअल्स लोकांना दिसतात. अशा प्रकारांमुळे आपण कार्यकर्त्यांचा अपमान करतो, हे दिसून येते.

व्हिडीओ व्हिज्युअल्स सोशल मिडीयावर कार्यकर्त्याचा अपमान करताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले आहे. स्टेजवर आम्ही नेते असतो. तेव्हा खाली बसून सतरंजी उचलणारा हा आमचाच कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखला पाहिजे, असा सल्ला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com