विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीतमहाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले. तर भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव झाला
Dushyant Chaturvedi Wins Yavatmal Council Bi Election
Dushyant Chaturvedi Wins Yavatmal Council Bi Election
Published on
Updated on

यवतमाळ : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत  महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले. तर भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव झाला. 31 जानेवारीला विधान परिषद पोटनिवडणूककीसाठी मतदान झाले मंगळवार (ता.चार) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. 

महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 मते मिळाली. तर भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांना 185 मते मिळाली. सहा मते अवैध निघाली. 489 एकूण मतदार होते. यवतमाळ जिल्हयातील वणी, केळापूर, राळेगांव, यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड या सात ठिकाणी मतदान घेण्यात आले होते.

अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांच्यात ही लढत झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात चतुर्वेदी यांनी बाजी मारली. कार्यकर्त्यांनी परिसरात एकच जल्लोष केला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com