ही वेळ चुका काढण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची : प्रफुल्ल पटेल 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुध्दा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटर मध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner
Published on
Updated on

गोंदिया : कोविडच्या दुसऱ्या लाटेत (In the second wave of covid) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. मात्र या संकटाचा सामना जिल्ह्यातील यंत्रणेने सक्षमपणे केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे. (The situation in Kovid in the district has now improved) या संकटाचा सामना करीत असताना यंत्रणेच्या काही त्रुटी आणि चुका राहिल्या असतीलही, मात्र ही चुका काढण्याची किंवा टिका करण्याची वेळ नाही. तर आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढण्याची वेळ आहे. कोविडच्या लढ्यात यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे खासदार प्रफुल्ल (MP Prafull Patel) पटेल यांनी सांगितले. 

खासदार पटेल हे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोविडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुध्दा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटर मध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील. तसेच देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्यात येणार आहे. तर गोंदिया येथे पुन्हा एक ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींग प्लांट उभारण्यात येणार आहे. 

स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून मी वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात असून रोज परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार सहषराम कोरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, नगरसेवक विनीत शहारे उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयात लवकरच सिटीस्कॅन मशीन
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडे कोविड रुग्णांच्या उपचार व त्यांच्या देखरेखीसाठी पुरेशी व्यवस्था आहे, असे सांगत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शासकीय रुग्णालयात लवकरच नवीन सीटीस्कॅन मशीन दिली जाईल. ऑक्सिजन टँक उभारण्यात येईल, अशी माहिती दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी  

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यःस्थितीत एक सिटीस्कॅन मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे आणखी एक सिटीस्कॅन मशीनच्या मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करावा. लवकरच सीटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. कोविड रुग्ण आजारातून बरे झाल्यानंतर त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशन करण्यात यावे. जिल्ह्यातील रुग्णालयात रुग्णांसाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून पर्याप्त औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. लोकांचे जीव वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे.

रब्बीतील धान खरेदी, नोंदणीला मुदतवाढ
खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली नाही. ऑनलाइन नोंदणीची मुदत गेली आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. तसेच रब्बीतील धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच धानाच्या भरडाईचासुद्धा तिढा सुटला असून, उघड्यावरील धानाची प्राधान्याने उचल केली जाणार असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com