गोंदिया : मुंबई, पुणे आणि विदर्भातील नागपूर व यवतमाळ जिल्यांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण असतानाच आज, शुक्रवारी सकाळी गोंदियातील एका संशयित व्यक्तीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत १२९ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. या व्यक्तींच्या संपर्कात ६१३ व्यक्ती आले आहेत. असे एकूण ७४२ व्यक्ती आहेत. त्यापैकी एकूण ७४० व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
यापैकी ५ व्यक्तींचा वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी, आज शुक्रवारी आलेल्या अहवालात एका व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच थायलंडवरून गोंदियात परतला आहे. आता हा व्यक्ती कोनाकोणाच्या संपर्कात आला, याचा शोध जिल्हा प्रशासन घेत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.