पॉर्न बघणाऱ्यांमध्ये पुणेकर पहिल्या क्रमांकावर, नाशीक, नागपूरमध्येही वाढतेय संख्या...

भारतात गेल्या चार पाच वर्षांपासून ८५७ पॉर्नसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही लोकांनी पॉर्न पाहणे थांबवलेले नाही. व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्विस, टोर ब्राऊझर किंवा मिरर साइट अशा पद्धतींचा वापर करून आजही पॉर्न पाहिल्या जाते.
Porn Search
Porn Search
Published on
Updated on

नागपूर : स्मार्ट फोनचे वापरकर्ते ज्या वेगाने वाढू लागले आहेत, तेवढ्याच झपाट्याने पॉर्न व्हिडिओ बघणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. युवा वर्गासह महिलांनाही याचा चस्का लागला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरदार महिलासुद्धा पॉर्न वेबसाइटवर सर्फिंग करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. पॉर्न बघणाऱ्यांमध्ये पुण्याचा पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. Punekar ranks first among the porn viewers increasing number in nasik and nagpur. 

उपराजधानीत पॉर्न किंवा सेक्स व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ‘गुगल’वर पॉर्न व्हिडिओ सर्च करण्यात नागपूरकरांचा तिसरा क्रमांक लागतो. प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आल्यामुळे पॉर्न बघणाऱ्यांची संख्या चार पट वाढल्याची माहिती एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. सेक्स व्हिडिओ आणि अश्‍लील चित्रफितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉर्नसाईट्सवर भेटी देणाऱ्यांच्या संख्येत जवळपास चौपट वाढ झाली आहे. यामध्ये शाळकरी मुले-मुली, तरुणी, महिला, युवा वर्ग आणि वृद्धांचाही समावेश आहे. पॉर्न सर्चिंगचे प्रमाण वाढल्यामुळे नागपूर सायबर पोलिसांनी वॉच ठेवणे सुरू केले आहे. पॉर्नची सर्चिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यावर आयपीसीच्या १४९, आयटी ॲक्‍टच्या सेक्‍शन ६७ (अ,ब,क) नुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

भारतात गेल्या चार पाच वर्षांपासून ८५७ पॉर्नसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही लोकांनी पॉर्न पाहणे थांबवलेले नाही. व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्विस, टोर ब्राऊझर किंवा मिरर साइट अशा पद्धतींचा वापर करून आजही पॉर्न पाहिल्या जाते. अनेकदा पॉर्न साइटच्या नावात थोडासा बदल करून ती साइट पुन्हा इंटरनेटवर उपलब्ध केली जाते. उलट बंदीनंतर पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत सातत्याने वरच्या क्रमांकावर असल्याचे चित्र आहे. २०२० च्या जानेवारी महिन्यातच पॉर्न पाहणाऱ्यांची आकडेवारी पॉर्नहबने प्रकाशित केली होती. त्या आकडेवारीनुसारही, पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर होता, हे विशेष. 

गुगल प्ले स्टोअरवर ॲप्स 
अनेक आंबटशौकीनांना अश्‍लील चित्रफिती बघण्याचा मोह आवरत नाही. सेक्स व्हिडिओसाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक ॲप्स आहेत. अगदी २० ते ४० एमबीपर्यंत क्षमता असलेले ॲप्स उपलब्ध आहेत. अन्य ॲप प्रमाणे पॉर्न व्हिडिओचे ॲप्स डाऊनलोड करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. काही ॲप्स सशुल्क डाऊनलोड केल्या जात आहेत. 

वृद्धांनाही मोह आवरेना 
पॉर्न वेबसाइटवर सर्फिंग करून आनंद घेण्याचा मोह वृद्धांनाही आवरता आला नाही. नागपुरात तर अनेक वृद्धांना ‘हसीन महिलाओं से दोस्ती करो सिर्फ हजार रुपए में’ या माध्यमातून अनेकांना लुटल्याचे समोर आले आहे. तसेच थेट न्यूड कॉल करून व्हिडिओ बनवून काही वृद्धांना खंडणी मागितल्याचे प्रकार समोर आले आहे. 

भारतात मॅक आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पॉर्न ॲप बंद असेल तरी इंटरनेटवर Apk (अँड्रॉइड पॅकेजिंग किट) च्या रूपात फाईल्स उपलब्ध असतात. अशा फाईल्स टेलिग्राम व्हॉट्सॲच्या माध्यमातून प्रसारित होत असतात. अशा फाईलद्वारे ॲप डाऊनलोड केल्यावर हे ॲप सिस्टमसाठी धोकादायक आहेत. अश्‍लील चित्रफिती किंवा फोटो डाऊनलोड करणे किंवा मोबाईलमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य केल्यास ५ वर्षे तुरुंगवास आणि १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. 
- केशव वाघ (सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम) 

वर्ष ---पॉर्नोग्राफी गुन्हे 
२०१९---३१ 
२०२०---२१ 
२०२१---१८ (जुलैपर्यंत) 
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com