नागपूर : सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते महिला दिनाच्या एका कार्यक्रमासाठी येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विशेष करून आजच्या राजकीय परिस्थितीवर आपल्या खास शैलीत त्यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये रविवारी पंतप्रधान मोदींचे भाषण ‘बह गया’, ‘बहक गया’ अशा स्वरूपाचे होते, अशा शब्दांत टीका करून सुप्रसिद्ध अभिनेते व भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी टिका केली. मिथुन चक्रवर्ती यांना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भाजपने पक्षात घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
महिला दिनाच्या एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांच्या भाषणात डेप्थही नव्हती. लोकांच्या जीवनाशी निगडित बाबींवर ते बोलूच शकले नाहीत. जीडीपी, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन हे ज्वलंत विषय टाळले. शेतकरी व जनतेला ‘दवा’ची नाही तर ‘दुवा’ आणि ‘मऱ्हम’ची गरज होती. पश्चिम बंगालची जनता ममतांच्या पाठीशी आहे. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. कडवा विरोधच लोकांमध्ये ममतांविषयी सहानुभूती निर्माण करण्याची शक्यता आहे. पवार यांच्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न करताच महाराष्ट्रात परिस्थिती पालटली. बिहारमध्येही एकट्या तेजस्वी यादव यांचे २५ हेलिकॉप्टर पाठलाग करीत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महिलेला हताश करण्याचे प्रयत्न
भाजपने फायद्यासाठी मिथुन चक्रवर्तींना सोबत घेतले आहे. त्यांच्यावर उशीर झाल्याची पाटी लावण्याची वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी हाणला. चक्रवर्ती आपले जवळचे मित्र आहेत आणि फार चांगला माणूस आहे. पण, भाजपमध्ये येताच साप, विंचू, कोब्रा यांसारख्या भाषेचा वापर केला. ही भाषा योग्य नसल्याचे सिन्हा म्हणाले. ममतांकडे मोठा अनुभव आहे. मात्र, भाजपद्वारे एका महिलेला हताश करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.