Shobha Bachhav : काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारानं घेतली भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

Shobha Bachhav Meet shivraj singh chauhan : दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्र शासनाला इशारा दिला होता. आता धुळ्याच्या खासदार डॉ बच्छाव यांनीही कृषिमंत्र्याची भेट घेतली आहे.
Shobha Bachhav  Meet shivraj singh chauhan .jpg
Shobha Bachhav Meet shivraj singh chauhan .jpgsarkarnama
Published on
Updated on

Dr. Shobha Bachhav News : लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा विषय गाजला. भारतीय जनता पक्षाला त्याचा मोठा फटका बसला. मात्र, नवे सरकार सत्तेत आल्यावर त्यादृष्टीने फारशा हालचाली घडलेल्या नाहीत.

कांदा निर्यात बंदी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी त्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापविले होते. त्याचा मोठा फटका विविध मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ( Bjp ) उमेदवाराला बसला.

आता भारतीय जनता पक्ष अन्य सहकारी पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्तेत आले आहे. पण, केंद्र सत्तेत आल्यानंतर कांदा निर्यात बंदी या विषयावर कृषिमंत्री आणि सरकार दोन्हीही फारसे गंभीर नाहीत, असा संदेश गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवनिर्वाचित खासदारांवर कांदा निर्यात बंदीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा दबाव वाढत आहे.

नवनिर्वाचित खासदारही यासंदर्भात सावध आहेत. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्र शासनाला इशारा दिला होता. आता धुळ्याच्या खासदार डॉ. बच्छाव यांनीही कृषिमंत्र्याची भेट घेतली आहे.

डॉ. बच्छाव यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ( shivraj singh chauhan ) यांची नुकतीच भेट घेतली. "कांदा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. केंद्र शासन सातत्याने या पिकाच्या बाजार व्यवस्थेत हस्तक्षेप करीत असते. केंद्र शासनाच्या हस्तक्षेपामुळे कांद्याचे बाजारभाव पडतात. त्यात आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे केंद्रशासनाने कांदा निर्यात बंदी कायमची रद्द करावी. याबाबत शेतकरी आणि बाजारपेठ दोन्हींचा विचार करून मध्यम मार्ग निवडावा," अशी मागणी बच्छाव यांनी कृषिमंत्री चौहान यांच्याकडे केली.

"धुळे आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी कांदा उत्पादन घेतात. केंद्र शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून कांद्यावर निर्यात शुल्क आकारले आहे. पाच महिन्यांपासून निर्यात बंदी केली आहे. यामध्ये शासनाकडून सकारात्मक पावले टाकली जात नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या या धोरणाने त्रस्त आहे, ही स्थिती विचारात घेऊन सरकारने तातडीने तज्ञांचे मत घ्यावे आणि कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी. शेतीच्या अवजारांवरील जीएसटी कर देखील रद्द करावा," अशी विनंतीही खासदार बच्छाव यांनी कृषीमंत्री चौहान यांच्याकडे केली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com