दादा, आम्हाला काल आनंद झालाच; तुम्हाला कुठले सुतक पडले होते : गिरीश महाजनांचा टोला (व्हिडिओ)

नाशिकमध्ये असलेल्या पूरस्थितीचे मंत्री गिरीश महाजन यांना गांभीर्य नाही. काल पूरपरिस्थिती असताना महाजन ३७० कलम रद्द करण्याचा आनंद साजरा करत नाचत होते, या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मागे राज्यात दुष्काळ पडला होता, तेव्हा आपण काय बोलला होता, ते आठवा असे महाजन यांनी सुनावले आहे.
दादा, आम्हाला काल आनंद झालाच; तुम्हाला कुठले सुतक पडले होते : गिरीश महाजनांचा टोला (व्हिडिओ)

जामनेर : नाशिकमध्ये असलेल्या पूरस्थितीचे मंत्री गिरीश महाजन यांना गांभीर्य नाही. काल पूरपरिस्थिती असताना महाजन ३७० कलम रद्द करण्याचा आनंद साजरा करत नाचत होते, या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मागे राज्यात दुष्काळ पडला होता, तेव्हा आपण काय बोलला होता, ते आठवा असे महाजन यांनी सुनावले आहे. काल आम्हाला आनंद झालाच होता, तुम्हाला कुठले सुतक पडले होते, असा सवाल महाजन यांनी अजित पवार यांना उद्देशून विचारला आहे.

काल गिरीश महाजन यांनी केलेल्या नाचाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. महाजन यांचा उल्लेख त्यांना 'नाच्या' असा केला. 'नाशिकमध्ये पूर आला तरी मंत्री नाचतात, नाच्याचे काम तुमचे नाही मंत्री' असे उदगार अजित पवार यांनी काढले होते. याबाबत महाजन म्हणाले, "अजित पवारांचे स्टेटमेंट ऐकले. नाशिकमध्ये पूरपरिस्थिती असताना मंत्री नाचत होते. त्यांना गांभीर्य नाही, असे अजित पवार म्हणाले. वास्तविक मी तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होतो. बारा-चौदा तास छातीभर पाण्यात फिरत होतो. चांदोरी गावात चार-पाच किलोमीटर पाण्याचा वेढा होता. त्या गावापर्यंत एनडीआरएफच्या बोटीतून मी गेलो. गावकऱ्यांना मदत केली. मला परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे." 

ते पुढे म्हणाले, ''सगळ्या राज्याला कल्पना आहे की जेव्हा राज्यात दुष्काळ पडला होता, तेव्हा लोक मुंबईत उपोषणाला बसले होते. जेव्हा काही लोक तुम्हाला भेटायला आले तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? काय बोललात हे मी इथे बोलत नाही. आपल्याला किती गांभीर्य आहे? हे यावरुन कळते. आपण स्वतःला विचारा की दुष्काळ पडलेला असताना आपण काय काय स्टेटमेंट केली होतीत. तशी स्टेटमेंट आम्ही कधी करत नाही. ज्या ज्या वेळी एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा गिरीश महाजन तिथे जागेवरच असतो. मी घरात बसून फोनवर बोलत नाही"

''ज्या गोष्टीसाठी मी तिरंगा घेऊन नाचलो, त्या गोष्टीचा आनंद प्रत्येक भारतीयाच्या मनात होताच. तुम्हाला काय सुतक पडलं होतं हे मला समजत नाही. ३७० कलम हा आमच्या देशावर लागलेला कलंक होता, तो पुसण्याचे काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मंत्रीमंडळाने केले. त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आणि प्रत्येक भारतीयाला आहे. म्हणून हातात तिरंगा घेऊन नाचलो, त्यात वाईट काय झाले? सगळी पूरस्थिती निवळलेली होती. अशा वेळी जेव्हा हा निर्णय झाला, त्यावेळी आम्हाला आनंद होणं साहजिक आहे. त्यामुळे आम्ही ढोल-ताशे वाजवले. हातात तिरंगा घेऊन नाचलो. त्यावर तुम्ही जे बोलता आहात ते किती योग्य आहे किती अयोग्य आहे, हे जनता ठरवते आहे. ही. त्या दिवशी आम्ही नाचलो त्याचा आनंद वेगळाच होता. १५ आॅगस्ट, १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आनंदाचा क्षण कालचा होता. देशाचा तिरंगा घेऊन आम्ही नाचलो त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com