गिरीश महाजनच भाजपला संपवतील : हरिश्चंद्र चव्हाण

भाजपमध्ये काही टोळ्या कार्यरत आहेत. त्यांनी माझी उमेदवारी कापली. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी मी लोकसभेसाठी अपक्ष उमेदेवारी करुन कोरड्या विहिरात उडी मारणार नाही. येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घेईन. मात्र मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून मिरवणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनच भविष्यात पक्षासाठी संकटमहोदय होऊ शकतात. तेच पक्षाला संपवतील," असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात केले.
गिरीश महाजनच भाजपला संपवतील : हरिश्चंद्र चव्हाण
Published on
Updated on

सुरगाणा : भाजपमध्ये काही टोळ्या कार्यरत आहेत. त्यांनी माझी उमेदवारी कापली. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी मी लोकसभेसाठी अपक्ष उमेदेवारी करुन कोरड्या विहिरात उडी मारणार नाही. येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घेईन. मात्र मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून मिरवणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनच भविष्यात पक्षासाठी संकटमहोदय होऊ शकतात. तेच पक्षाला संपवतील," असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात केले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. येथुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन प्रवेश केलेल्या भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले खासदार चव्हाण यांनी शुक्रवारी सुरगाणा येथे समर्थकांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, "मला राष्ट्रवादी कॉंग्रेसचीदेखील ऑफर आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. काहीही झाले तरी मी आदिवासींकरिता तडजोड करणार नाही. अपक्ष निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, मी कोरड्या विहिरीत उडी मारणार नाही." मला उमेदवारी मिळू नये यासाठी एन. डी. गावित यांनी प्रमुख भूमिका बजावली असून, राजकारणातील प्रतिस्पर्धी मित्र आमदार जे. पी. गावित यांनी मात्र माकप'कडून निवडणूक लढविण्याची ऑफर दिल्याचेही त्यांनी नमूद केले. आम्ही दोघे एकत्र आल्यास मतदान केंद्रावर भाजपचा एजंटदेखील राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

"आदिवासींचे प्रश्‍न लोकसभेत मांडल्यानेच माझी उमेदवारी कापली गेली. त्यामुळे धुळे, नंदुरबार, दिंडोरी, नाशिक आणि पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या मतदानावर गंभीर परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातील 21 आदिवासी सामाजिक संघटना माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही पैसे खाल्ले नाहीत. आठ दिवसांपूर्वी भाजपवर टीका करणाऱ्या डॉ. भारती पवार तुम्हाला लायक का वाटल्या?,मी का लायक नाही? त्यांच्या घरातच भांडणे आहेत. मी चारित्र्यहीन आहे का? कोणाचे पैसे खाल्ले का? या विषयांवर पक्षाने जनतेला सांगावे. भाजपला मौनी खासदार हवे आहेत. आदिवासींच्या प्रश्‍नांवर बोलणारे, आवाज उठविणारे त्यांना नकोत." उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधीलच अनुसूचित जमातीच्या एका खासदाराने दिल्ली दरबारी फिल्डिंग लावली असून, चव्हाण चौथ्यांदा खासदार झाल्यास ते मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात, म्हणून त्यांचा पत्ता आताच कट करा, अशी मागणी केली होती, असाही आरोप त्यांनी केला.

यावेळी ज्येष्ठ नेते मोतीराम गावित अध्यक्षस्थानी होते. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, उपसभापती इंद्रजीत गावीत, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात, विजय कानडे, दिनकर पिंगळे, भावडू चौधरी, योगेश बर्डे, नरेंद्र जाधव, मनोज शिंदे, गोपाळ लहांगे, तुकाराम जाधव, भारतीय जनता युवा मार्चाचे जिल्हा अध्यक्ष समीर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या कलावती चव्हाण, मदन लोखंडे, रंजना लहरे, ज्ञानेश्‍वर कराटे आदी व्यासपीठावर होते.

गिरीश महाजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com