Nahik News : नाशिक येथील काही संघटनांनी नथुराम गोडसे यांच्या कलशदर्शनाची घोषणा केली होती. त्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस सेवा दलातर्फे रामकुंडावर गांधी ज्योत येथे मूक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
नाशिक येथील काही संघटनांनी शुक्रवारी (ता. 19) पुणे येथील नथुराम गोडसे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी कार्यक्रम आयोजिला होता. या कार्यक्रमासाठी नाशिकमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सेवा दलातर्फे या उपक्रमाचा निषेध म्हणून शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत महात्मा गांधी ज्योत येथे मूक सत्याग्रह करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करणाऱ्या वृत्तीचा निषेध केला. असे कार्यक्रम म्हणजे जाणिवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संबंधित आयोजक यातून काय संदेश देऊ इच्छितात हे अनाकलनीय आहे, असे सांगितले.
ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सबंध जगाला व देशाला मानवतेचा संदेश देण्याचे काम केले. अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा विचार सर्वसमावेशक आणि सबंध समाजाला एकत्र करून मानवतेचा उत्थानाचा होता. जगभर त्याची प्रशंसा आणि अनुकरण केले जाते. असे असताना काही घटक जाणिवपूर्वक वाकडी वाट धरत आहेत. त्यासाठी आम्ही प्रभू श्रीरामाला आवाहन करतो की, त्यांनी अशा प्रवृत्तींना सद्बुद्धी देवो.
या आंदोलनामध्ये प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, लक्ष्मण धोत्रे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती जाधव, विजय राऊत, सुरेश मारू, जुलीताई डिसूजा, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, सुचिताताई बच्छाव, हनीफ बशीर, उद्धव पवार, बबलू खैरे, भालचंद्र पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.