भाजप नगरसेवकाने लावलेला आक्षेपार्ह फलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला (व्हिडिओ)

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर फलक लावणाऱ्या भाजप नगरसेवकाला आज पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करीत उत्तर दिले. यावेळी लावलेले फलक जाळले. "भाजपवाल्यांनो सत्तेचा माज करु नका. आम्ही तुमच्यासारखे असभ्य नाही. अन्यथा तुमच्या घरात उत्तर देऊ. पातळी सोडाल तर आमचाही हिसका दाखवू'' या शब्दात यावेळी इशारा देण्यात आला.
 भाजप नगरसेवकाने लावलेला आक्षेपार्ह फलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला (व्हिडिओ)
Published on
Updated on

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर फलक लावणाऱ्या भाजप नगरसेवकाला आज पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करीत उत्तर दिले. यावेळी लावलेले फलक जाळले. "भाजपवाल्यांनो सत्तेचा माज करु नका. आम्ही तुमच्यासारखे असभ्य नाही. अन्यथा तुमच्या घरात उत्तर देऊ. पातळी सोडाल तर आमचाही हिसका दाखवू'' या शब्दात यावेळी इशारा देण्यात आला. 

भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी असभ्य भाषेतील फलक शहरात लावले होते. एक फलक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयापुढे लावण्यात आला. ही महिती मिळाल्यावर त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, युवक आघाडीचे पुरषोत्तम कडलग, शाकेरा शेख, सुजाता गाढवे, संगिता गांगुर्डे, दीक्षा दोंदे, पुष्पा राठोड यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी भाजपने लावलेला फलक फाडून तो जाळला. 

त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घोषणा देत आंदोलन केले. यावेळी जिल्हा अध्यक्षा बलकवडे म्हणाल्या, ''भाजपच्या नगरसेवकाने राष्ट्रवादीच्या सन्माननीय नेत्यांविषयी अत्यंत लज्जास्पद भाषा असलेला फलक लावला आहे. त्यातून या पक्षाचा स्तर स्पष्ट होतो. त्यांना सत्तेचा माज आला आहे. शहरभर फलक लावतांना राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर फलक लावण्याची हिंमत त्यांनी केली. आम्ही सुसंस्कृत आहोत अन्यथा त्यांच्या घरात घुसुन त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिले असते. त्यांनी यापुढे असे प्रकारर केले, तर आमचा हिसका दाखवू." 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com