Narendra Modi News: पेन्शनधारकांचा गनिमी कावा, मोदींच्या आधीच केली काळारामाची आरती!

Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा प्रशासनाने चांगलाच धसका घेतल्याचे दिसते आहे.
kalaram temple
kalaram temple Sarkarnama
Published on
Updated on

Pension Holders Issue : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. यावेळी कोणालाही जवळपासही फिरता येणार नाही, अशी कडक सुरक्षाव्यवस्था असेल. मात्र, पेन्शनधारकांच्या गनिमी काव्यापुढे धास्ती घेतलेले प्रशासनदेखील असहाय ठरले.

इपीएफ पेन्शनचा प्रश्न देशभरात अतिशय गंभीर बनला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व निवृत्त कर्मचारी हजार ते दीड हजार अशा तुटपुंज्या पेन्शनवर उदरनिर्वाह करीत आहेत. यासंदर्भात सातत्याने आंदोलन करूनही केंद्र सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पेन्शनवाढीचे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे, असे आवाहन करीत ज्येष्ठ नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

kalaram temple
CM Eknath Shinde : शिंदेसाहेब, आता हीच वेळ! लोकसभा निवडणुकीतच करून दाखवा...

पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. यावेळी हा सबंध परिसर सील करण्यात येणार आहे. सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडक असल्याने कोणतेही आंदोलन, निदर्शने अथवा निवेदन देण्याचा प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आणि प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना गनिमी कावा दाखवत पेन्शनर्स ज्येष्ठ नागरिकांनी या सगळ्या यंत्रणेवर मात करण्याचा प्रकार आज घडला.

पेन्शनधारकांनी त्यावर तोडगा काढत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच मंदिरात जाऊन भजन करीत पंतप्रधानांना पेन्शनचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती दे, असे साकडे काळारामाला घातले. गुरुवारी सकाळी ११ वाजता नाशिक पेन्शनर्स असोसिएशनने पोलिस आणि प्रशासन यांना कोणताही सुगावा न लागू देता आयटकचे राज्य सचिव राजू देसले, पेन्शनर्स फेडरेशनचे रमेश सूर्यवंशी, डी. बी. जोशी, चेतन पनीर, नामदेव बोराडे यांनी शेकडो पेन्शनरसह काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी काळारामाची आरती केली. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारातच त्यांनी टाळ वाजवत तासभर भजन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विविध मागण्यांसाठी पेन्शनर्स असोसिएशन आक्रमक

याबाबत पेन्शनर्स असोसिएशनचे नेते राजू देसले म्हणाले, केंद्रात सत्तेवर येण्याआधी भाजपने पेन्शन वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यावर ते सगळे विसरले आहेत. पेन्शनधारकांना किमान 9000 रुपये पेन्शन मिळावी, महागाई भत्ता त्याला निगडित करावा आणि पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनर्सच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सेवा व प्रवासात सवलत मिळावी, ही आमची मागणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेतील, तेव्हा या गरीब आणि असहाय घटकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना हा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती मिळावी, असे साकडे आम्ही आज काळाराम मंदिरात घातले असल्याचे पेन्शनधारकांकडून सांगण्यात आले.

(Edited by Sachin Waghmare)

R...

kalaram temple
Bjp News : देशात अयोध्या, तर नाशिकला काळाराम मंदिराची चर्चा; पंतप्रधानांनंतर, उद्धव ठाकरेंचा दौरा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com