शरद पवारांच्या कानगोष्टींनी कॉंग्रेस सक्रीय, दिंडोरीतील बाधा दूर 

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रचारात अलिप्त असलेल्या कॉंग्रेसने सहभागी होण्यासाठी दस्तुरखूद्द शरद पवारांनीच पुढाकार घेतल्याने राजकीय कोंडी अखेर दूर झाली. लोकसभा निवडणुकीला अवघ्या नऊ-दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारात अलिप्त असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील कोंडी अखेर रविवारी (ता. 21) दूर झाली.
शरद पवारांच्या कानगोष्टींनी कॉंग्रेस सक्रीय, दिंडोरीतील बाधा दूर 
Published on
Updated on

नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रचारात अलिप्त असलेल्या कॉंग्रेसने सहभागी होण्यासाठी दस्तुरखूद्द शरद पवारांनीच पुढाकार घेतल्याने राजकीय कोंडी अखेर दूर झाली. लोकसभा निवडणुकीला अवघ्या नऊ-दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारात अलिप्त असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील कोंडी अखेर रविवारी (ता. 21) दूर झाली. त्याला कारण ठरली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नांदगावमधील जाहीर सभा. 

शरद पवार यांच्यासारखा दिग्गज आणि राष्ट्रीय पातळीवरील नेता सभा सुरू होण्यापूर्वी स्वतः माजी आमदार अॅड. अनिल आहेरांच्या निवासस्थानी गेल्याने नांदगावमधील राजकीय चित्रच साफ बदलून गेले. दस्तुरखुद्द शरद पवारच समोर असल्याने अनिल आहेर यांनी राष्ट्रवादी व स्थानिक आमदार पंकज भुजबळ यांच्यासंबंधी लवचिक धोरण स्वीकारत राजकीय तक्रारीचा सूर आळविण्याचे टाळले. चर्चेत पवार यांनी नांदगावचा दुष्काळ, सिंचनाच्या मुद्‌द्‌यावर तसेच नार-पारचा प्रश्‍न या विषयांना प्राधान्य दिल्याने व शरद पवार यांनीही लगेचच सकारात्मकता दाखवीत हे प्रश्‍न मार्गी लावण्याचे संकेत दिले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय कोंडी अखेर दूर झाली. 

परिणामी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांना मोठा दिलासा मिळाला. स्वतः माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या वेळी उपस्थित होते. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील कटुता काही प्रमाणात कमी होण्यास मदतच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने कॉंग्रेसचे वारंवार खच्चीकरण कसे केले, याबाबत या बैठकीत चर्चा घडेल, असे सुरवातीला वाटत असताना अनिल आहेर यांनी तालुक्‍याच्या समस्या सोडविण्यासाठी येणाऱ्या अडचणींना चर्चेच्या वेळी प्राधान्य देत प्रगल्भता दाखविल्याने नांदगावच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील यांनी नारपार प्रश्‍नावर ते करीत असलेल्या पाठपुराव्याची माहिती पवार यांना दिली. आहेरांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेचे पडसाद जाहीर सभेतही दिसून आले. सभेतदेखील पवार यांनी अनिल आहेर यांच्याबाबत वारंवार तसा उल्लेख केला. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.  पवार यांच्यासारखा नेता सभा सुरू होण्यापूर्वी आहेरांच्या निवासस्थानी गेल्याने त्यांच्या विरोधकांनादेखील आहेरांचे राजकीय वजन व प्रभाव याचे प्रत्यंतर यानिमित्ताने आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com