खोटं बोलायचं, हेच भाजपचे धोरण : डाॅ. सुधीर तांबे

राफेल घोटाळ्याबाबत मोदी बोलतच नाहीत, पण नोटाबंदीमुळे अनेक लोकांचा रोजगार गेला, हे उघड वास्तव असताना खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं आणि फसव्या घोषणा व खोटी आश्‍वासने देऊन सर्वसामान्यांना भुलविण्याचे धोरण भाजप सरकार राबवत असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.
खोटं बोलायचं, हेच भाजपचे धोरण : डाॅ. सुधीर तांबे
Published on
Updated on

नाशिक : राफेल घोटाळ्याबाबत मोदी बोलतच नाहीत, पण नोटाबंदीमुळे अनेक लोकांचा रोजगार गेला, हे उघड वास्तव असताना खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं आणि फसव्या घोषणा व खोटी आश्‍वासने देऊन सर्वसामान्यांना भुलविण्याचे धोरण भाजप सरकार राबवत असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

नाशिक कॉंग्रेसतर्फे एकदिवसीय संवाद प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते सोमवारी येथील स्वामिनारायण मंदिर हॉलमध्ये झाले. ते म्हणाले, ''राफेल लढाऊ विमान खरेदीतील घोटाळा, सामान्यांना पडलेले प्रश्‍न, रोजगार, महागाई, शेतमालाचे घरसणारे दर, शेतकरी आत्महत्या, शिक्षणातील अडचणी, कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी. सरकारमधील महत्वाचे नेते काहीच बोलत नाहीत. मात्रते वेगळ्याच विषयांवर चर्चा घडवतात. मन की बात करतात. सगळेच लोक त्याला आता कंटाळले आहेत. त्याविषयी लोक उघड बोलू लागले आहेत. त्याचे राजकीय परिणाम निश्‍चित दिसतील.''

यावेळी कॉंग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी चेल्ला वामशी चॉंद रेड्डी शिबिराचे समन्वयक आमदार रामहरी रूपनवार, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापराव वाघ, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव डॉ. हेमलता पाटील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com