पंकज भुजबळांसाठी छगन भुजबळांचे शिवबंधन ठरणार 'ओबीसी' चक्रव्युह? 

येवला (छगन भुजबळ) पंकज भुजबळ (नांदगाव) हे दोन्ही मतदारसंघ शेजारी आहेत. गेली दहा वर्षे तेथे भुजबळांचे वर्चस्व आहे. 'ओबीसी पॅटर्न' आणि व्यक्तीगत प्रभावातून त्यांनी निवडणूका जिंकल्या. सध्या नांदगाव मतदारसंघात भुजबळांची एकाधिकारशाही असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांश पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने नगरपालिका, प्रमुख ग्रामपंचायती यांसह बहुतांशी सत्ताकेंद्र काबीज केली आहेत.
Pankaj Bhujbal - Chagan Bhujbal - Suhas Kande
Pankaj Bhujbal - Chagan Bhujbal - Suhas Kande
Published on
Updated on

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडणार... ते शिवसेनेत जाणार.... फक्त केव्हा? याचा गुंता सुटत नाही. नांदगाव मतदारसंघात त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आमदार आहेत. त्यामुळे छगन भजबळ यांनी शिवबंधन बांधलेच तर शिवसेनेच्या इच्छुकांची संधी जाणार. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे ओबीसी उमेदवार तयार केला आहे. अशा स्थितीत सर्वच ओबीसी घटकांचे राजकीय धृवीकरण होऊन पित्याचे शिवबंधन येत्या निवडणुकीत पुत्र पंकज भुजबळांसाठी राजकीय चक्रव्युह ठरण्याची शक्‍यता आहे. 

येवला (छगन भुजबळ) पंकज भुजबळ (नांदगाव) हे दोन्ही मतदारसंघ शेजारी आहेत. गेली दहा वर्षे तेथे भुजबळांचे वर्चस्व आहे. 'ओबीसी पॅटर्न' आणि व्यक्तीगत प्रभावातून त्यांनी निवडणूका जिंकल्या. सध्या नांदगाव मतदारसंघात भुजबळांची एकाधिकारशाही असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांश पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने नगरपालिका, प्रमुख ग्रामपंचायती यांसह बहुतांशी सत्ताकेंद्र काबीज केली आहेत.

जिल्हाप्रमुख सुहास कांदे त्यांचे संभाव्य उमेदवार आहेत. कांदे आणि भुजबळ यांच्या राजकीय हाडवैर आहे. अशा स्थितीत भुजबळांनी शिवबंधन बांधल्यास शिवसेनेच्या या नेत्यांची कोंडी होईल. त्यांचे पाठीराखे फटकून राहतील. त्यामुळे पंकज भुजबळ यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली, तर शिवसेनेची किती यंत्रणा मनापासून प्रचारात उतरेल हे अस्पष्ट आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सहाय्यक आयुक्त व धनगर समाजाचे नेते बाजीराव शिंदे गेले वर्षभर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यांना वरिष्ठांकडून आश्‍वासन मिळाल्याचे बोलले जाते. भुजबळ गेल्यास त्यांच्यासाठी उमेदवारीचे मैदान मोकळे आहे. अशा स्थितीत भुजबळांनी शिवबंधन बांधल्यास समाजाच्या इच्छुकावर अन्यायातून वंजारी समाजात नाराजीचा संदेश जाईल. दुसरीकडे मतदारसंघातील महत्वाचा घटक असलेल्या धनगर समाजाला 1990 नंतर उमेदवारीची संधी मिळत असल्याने ते एकवटतील. 

सध्याचे चित्र असे आहे की, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आमदार पंकज भुजबळ, सुहास कांदे, बाजीराव शिंदे हे सर्व ओबीसी घटक आहेत. तर भाजपकडे जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार, रत्नाकर पवार, मीाज आमदार संजय पवार हे मराठा समाजातील नेते आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस नेते माजी आमदार अनिल आहेर यांना हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी हवा आहे. अशा स्थितीत छगन भुजबळ यांनी शिवबंधन बांधल्यास पंकज भुजबळ यांना उमेदवारी करताना ओबीसी घटकांकडून राजकीय चक्रव्यूह निर्माण होऊ शकतो.

मागासवर्गीय मते वंचित आघाडीकडे सरकली आहेत. लोकसभा निवडणूकीत त्यांना पंधरा हजार मते मिळाली होती. त्यात काही प्रमाणात वाढ होऊ शखते. हे भुजबळांची हक्काची मते होती. ती दुरावल्याने विधानसभा निवडणुकीचा चक्रव्युह पंकज भुजबळ छेदतील काय? याचीच चर्चा सुरु आहे.

हे देखिल वाचा -

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com