Andhra Pradesh : चंद्राबाबू करताय नवी मुंबईचा अभ्यास; सिडकोला आंध्रच्या मंत्र्यांची भेट

Amravati New smart Capital Andra pradesh : नवी मुंबई शहराच्या धर्तीवर आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी अमरावतीचा नियोजनबद्ध विकास व्हावा याकरिता गारू यांनी बुधवारी (31 जुलै) सिडकोला भेट दिली.
Amravati New smart Capital Andra pradesh
Amravati New smart Capital Andra pradeshSarkarnama
Published on
Updated on

Andra pradesh Government : आंध्रप्रदेश सरकारला अमरावती शहराला राजधानी म्हणून विकसित करायचे आहे. त्यामुळे सरकारकडून विविध योजना आणि रचना करण्यासाठी आंध्रप्रदेश राज्याचे नगरविकासमंत्री डॉ. पी नागायण गारू यांनी नवी मुंबईला भेट दिली.

नवी मुंबई शहराच्या धर्तीवर आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी अमरावतीचा नियोजनबद्ध विकास व्हावा याकरिता गारू यांनी बुधवारी (31 जुलै) सिडकोला भेट दिली. गारू यांचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्वागत केले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024- 25 च्या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशातील अमरावती राजधानी शहर प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या अमरावती शहर आंध्र प्रदेशसाठी महत्त्वाचे शहर ठरणार आहे. अमरावती हे ग्रीनफिल्ड कॅपिटल सिटी म्हणून विकसित केले जात आहे. आधुनिक शहरी नियोजन आणि विकसित शहर म्हणून या शहराला आघाडीवर ठेवण्यासाठी शहराच्या डिझाईनमध्ये स्मार्ट सिटीच्या वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे.

अमरावती हे शहर विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी गारू आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईतील प्रकल्पस्थळांना भेट दिली. सिडको भवन येथे शिष्टमंडळा समेर सिडकोच्या (CIDCO) प्रकल्पांचे सादरीकरण देखील करण्यात आले.

Amravati New smart Capital Andra pradesh
Ray Nagar : 'रे नगर'मुळे सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर; काय आहे 'त्या' मागचा रंजक इतिहास

याप्रसंगी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, अतिरिक्त मुख्य नियोजनकार आशितोष निखाडे, वरिष्ठ नियोजनकार प्रांजली माने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) राजधानीचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी शहरांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधांसह सचिवालय, विधिमंडळ, उच्च न्यायालयाच्या इमारती विकसित करण्यात येणार आहेत.

Amravati New smart Capital Andra pradesh
BJP Politics In Odisha : ओडिशामध्ये सुरू झाला 'खेला'? ; भाजपचा नवा गड राज्यसभेत सेट करणार नंबर गेम!

त्यासोबतच जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रे विकसित तसेच अमरावती शहराला 'नॉलेज हब' बनवायचे ध्येय सध्या सरकार समोर आहे. या सुविधांसह शासकीय गृहनिर्मितीही नियोजित आहे.

या संदर्भात भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण स्वयंपूर्ण शहरे विकसित करण्याचा दीर्घ अनुभव असणाऱ्या सिडकोच्या नगर नियोजनातील प्रारूपांचा अभ्यास करण्याकरिता सिडकोच्या विविध विकास प्रकल्पांना भेट देण्याच्या अनुषंगाने या भेटीचे नियोजन सिडकोतर्फे करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com