भाजप आमदार ठाकूरांना एकनाथ शिंदेंचा दणका; तीनशे कोटींचा भूखंड रद्द

ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे वाटप केलेल्या तब्बल 300 कोटी रुपयांचा 35780 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड रद्द करण्यात आला आहे.
BJP MLA Prashant Thakur
BJP MLA Prashant ThakurSarkarnama
Published on
Updated on

नवी मुंबई : पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांना नगरविकास विभागाने मोठा दणका दिला आहे. ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे वाटप केलेल्या तब्बल 300 कोटी रुपयांचा 35780 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड रद्द करण्यात आला आहे. शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) मंत्री असलेल्या नगरविकास विभागाने सिडकोला (Cidco) याबाबतचे निर्देश दिले आहेत. भूखंड वाटपात अनियमितता आढळल्याचा दावा नगरविकास विभागाने केला आहे.

महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार आणि भाजप (BJP) असा सामना राज्यात रंगला आहे. भाजपच्या नेत्यांकडून आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले जात आहेत. तर आघाडीतील नेत्यांकडूनही भाजपच्या विविध नेत्यांची प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा देत तक्रारी केल्या जात आहेत. त्यातच भाजपचे आमदार ठाकूर यांचा भूखंड रद्द केल्याने आघाडी विरूध्द भाजप असा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP MLA Prashant Thakur
भाजपनं 'टोमणा बॉम्ब' टाकत मुख्यमंत्री ठाकरेंना केलं घायाळ!

काय आहे प्रकरण?

प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष असताना जासई येथे पत्नीच्या नावे असलेली जमीन सिडकोला संपादित करण्यासाठी त्यांनी भाग पाडले. त्याबदल्यात साडेबावीस योजनेअंतर्गत उलवे येथे 35780 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड वाटप करून घेतल्याची तक्रार नगरविकास खात्याकडे आली होती. याची चौकशी झाल्यानंतर त्यात अनियमितता आढळ्याचा ठपका विभागाने ठेवला आहे. ठाकरू यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांना त्यांच्या जासई येथील संपादित जागेच्या बदल्यात मोबदला म्हणून उलवे येतील सेक्टर 29 मध्ये भूखंड देण्यात आला होता. पण त्यांनी हा भूखंड घेण्यास नकार दिल्याने हा भूखंड रद्द करून सिडकोने उलवे, पुष्पकनगरमधील सेक्टर 26 मध्ये भूखंड दिला. ही प्रक्रिया बेकायदेशीरपणे केल्याचा ठपका विभागाने ठेवला आहे.

सिडकोने वाटप केलेल्या भूखंडप्रकरणी नगरविकास विभागाने अप्रत्यक्षपणे संबंधित अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. ही प्रक्रिया नियमबाह्य होती. त्याचप्रमाणे सिडकोच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये भूखंड वाटपाची सोडत काढणे अपेक्षित असते. परंतु तसे न करता हे भूखंड वाटप व्यवस्थापकीय संचालक व सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती, असे निष्कर्ष विभागाने काढले आहेत. त्याआधारे वर्षा ठाकूर यांना दिलेला भूखंड रद्द करण्यात आला आहे.

BJP MLA Prashant Thakur
दिल्लीनंतर अमित शहांचा पंजाबलाही दणका; राजधानीत येऊन केली मोठी घोषणा

प्रशांत ठाकूर हे 2019 मध्ये सिडकोचे अध्यक्ष होते. त्याच काळात भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते प्रशांत पाटील यांनी याबाबत नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. तसेच काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानेही चौकशीही मागणी केल्याचे समजते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत नगरविकास विभागाने ठाकूर यांच्यासह भाजपलाही दणका दिला असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com