Navi Mumbai Airport: स्मरण केलं पण घोषणा नाहीच! दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला न देणं भाजपला जड जाणार?

Navi Mumbai International Airport: काल पर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळं आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात याची घोषणा होईल असं वाटत होतं, पण अशी अधिकृत घोषणाच झाली नाही.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airportsarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Airport Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन झालं. काल पर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळं आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात याची घोषणा होईल असं वाटत होतं, पण अशी अधिकृत घोषणाच झाली नाही. त्यामुळं विमानतळाला नेमकं कोणाचं नाव देणार? यावरुन अजूनही संभ्रम कामय आहे. पण दि. बा. पाटलांचं नाव देणं भाजपला जड जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

Navi Mumbai Airport
Diwali Firecrackers: दिवाळीच्या काळात मोठ्या आवाजातील फटाके फोडण्यास बंदी! पुणे पोलिसांनी जाहीर केली नियमावली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पार पडलं. पण यावेळी केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच उल्लेख वारंवार केला गेला. दि. बा. पाटील यांच्या नावासह नवी मुंबई विमानतळाचा उल्लेखच झाला नाही किंवा तशी अधिकृत घोषणाही झाली नाही. पंतप्रधानांच्या भाषणांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील भाषणं झाली पण कोणीही दि. बा. पाटील यांच्या नावाचा विमानतळाचं नाव म्हणून उल्लेख केला नाही. त्याचबरोबर व्यासपीठाच्या मागे लावण्यात आलेल्या फलकावरही दि. बा. पाटलांचा कुठेही उल्लेख आढळला नाही. केवळ पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या कार्याचं स्मरण केलं पण मुख्यत्वे नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव निश्चित झाल्याची जी चर्चा सुरु होती, त्याची घोषणा शेवटपर्यंत झालीच नाही.

Navi Mumbai Airport
BJP President News: मोदी- शहांनी 'प्लॅन' बदलला; भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून 'या' दोन बड्या नेत्यांचा पत्ता कट

दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी विमानतळाबाहेरील एक फलक मात्र सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या निळ्या रंगाच्या फलकावर 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' नवी मुंबई असा उल्लेख दिसत होता. पण केवळ पाटीवर नाव झळकण्यापेक्षा अधिकृतरित्या दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी घोषणा करण्यात आली नाही. यामुळं आता अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airport : 19 हजार 650 कोटींचा खर्च, हजारो एकरवर उभारणी; आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

स्थानिकांची जुनीच मागणी

कारण नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला दि. बा. पाटील यांच नाव देण्यात यावं ही खूप जुनी मागणी होती. २८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये नवी मुंबई विमानतळाची मागणी पुढे आली. यासाठी अनेक आंदोलनं झाली, मोर्चे देखील काढले गेले. पण दरम्यानच्या काळात या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. पण स्थानिकांचा केवळ दि. बा. पाटील यांच्या नावाचाच आग्रह कायम होता. पण आता दि. बा. पाटलांच्या नावाच्या प्रस्तावावरच मोदी सरकारनं शिक्कामोर्तब केल्याचं सागितलं जात असताना आज याची अधिकृत घोषणा मात्र मोदींनी केलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com