Diwali Firecrackers: दिवाळीच्या काळात मोठ्या आवाजातील फटाके फोडण्यास बंदी! पुणे पोलिसांनी जाहीर केली नियमावली

Diwali Firecrackers: सुप्रीम कोर्टाचे यांसदर्भातील आदेश आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या निर्देशांनुसार पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
Firecrackers
Firecrackers
Published on
Updated on

Diwali Firecrackers: दिवाळीच्या काळात रात्रीच्यावेळी ध्वनी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांवर पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाचे यांसदर्भातील आदेश आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या निर्देशांनुसार पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Firecrackers
Navi Mumbai International Airport : 2 रनवे, 4 टर्मिनल, कुठूनही चेकिंग अन् कमळाच्या डिझाईन : नवी मुंबई विमानतळाची 5 वैशिष्ट्ये

नियमावली काय?

  1. दिवाळीच्या काळात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मोठ्या आवाजातील, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी जाहीर करण्यात आली आहे.

  2. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांबाबत प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. फटाक्यांचा आवाज १२४ डेसिबलपेक्षा जास्त नसावा आणि १०० पेक्षा जास्त चेन लिंक असलेल्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यास मनाई आहे.

  3. याव्यतिरिक्त, शाळा, रुग्णालये आणि न्यायालय परिसरासह संवेदनशील क्षेत्रांच्या १०० मीटरच्या आत फटाके फोडू नयेत.

  4. यामध्ये विशेषतः रस्ते, पूल, घाट अशा क्षेत्रांपासून १० मीटरपर्यंत फटाके फोडण्यास विशेषतः मनाई करण्यात आली आहे.

  5. २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान फटाके विक्रेत्यांना तात्पुरते परवाने दिले जातील.

Firecrackers
Vaibhav Khedekar : तीनवेळा डावलून वैभव खेडकरांचा ओढा भाजपकडेच : पॉलिटिकल करिअरसाठी पुन्हा चव्हाणांच्या भेटीला

दिवाळी उत्सवाच्या काळात पर्यावरणीय चिंता आणि सार्वजनिक आरोग्याशी संतुलन राखणं गरजेचं आहे. हा सण सुरक्षित आणि शांततेत साजरा करण्यासाठी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com