Mumbai News : मुंबई शिक्षक विधान परिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी शिक्षक संचालक ज. मो. अभ्यंकर यांच्या नावाची उमेदवारीची घोषणा अडचणी ठरली आहे.
देशात गाजलेल्या आदर्श घोटाळ्यात ज. मो. अभ्यंकर यांच्यावर आरोप होते, याची आठवण शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू वाघमारे यांनी करून दिली. भाजप नेते अशोक चव्हाण यांचे नाव असलेल्या आदर्श घोटाळा असल्याकडे देखील राजू वाघमारे यांनी लक्ष वेधले.
राज्यात मुंबई, कोकण आणि नाशिक मतदारसंघात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. मुंबईतील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिक्षकांचे उमेदवार म्हणून ज. मो. अभ्यंकर यांच्या नावाची मंगळवारी घोषणा केली. अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा करताच त्यावरून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू वाघमारे यांनी टायमिंग साधलं. ज. मो. अभ्यंकर यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप आहे, असे सांगून शिवसेना ठाकरे पक्षाला वाघमारे यांनी खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राजू वाघमारे म्हणाले, "अभ्यंकर यांच्यावर आदर्श घोटाळ्यातील आरोप आहेत. भाजप (BJP) नेते अशोक चव्हाण यांचे नाव असलेल्या हा आदर्श घोटाळा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मुंबई शिक्षक मतदार संघात देशविरोधी काम करणाऱ्या भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी दिली आहे. सरकारी नोकरीत असून देखील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठीचे बांधलेले घर मिळवले. हा शहीद जवांनाचा अपमान नाही का? असा सवाल राजू वाघमारे यांनी केला.
आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळवण्यासाठी अभ्यंकर यांनी 15 हजार रुपये वेतन मिळत असल्याचे दाखवलं होते. दाखवलेल्या 15 हजार रुपयांच्या वेतनावर 80 ते 90 लाखांचा फ्लॅट पदरात पाडून घेतला. अभ्यंकर यांनी देशातील शहीद जवानांचा अपमान करणार असून शिवसेना ठाकरे पक्षाने देशद्रोही उमेदवार शिक्षक मतदारसंघात उभा केल्याचा घाणाघात राजू वाघमारे यांनी केला.
ज. मो. अभ्यंकर यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली. देशाची फसवणूक केली. आदर्श घोटाळ्यात त्यांना सीबीआयने देखील चौकशीसाठी बोलावले होते. याशिवाय अल्पसंख्याक आयोगावर नेमणुकीस असताना अल्पसंख्याक शाळांचे अनुदान देखील बंद केले होते. अभ्यंकर यांच्या वयाचा मुद्द्यावर देखील राजू वाघमारे यांनी हल्ला चढवला. 80 वर्षाचे असताना केवळ सत्ता आणि पैश्यासाठी अभ्यंकर उभे राहत आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील सत्ता आणि पैशाचा मोह सोडवत नाही. अशा भ्रष्टाचारी उमेदवाराला शिक्षक मत देणार नाही, असेही राजू वाघमारे यांनी विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.