Navi Mumbai News: म्हात्रे-नाईक शीतयुद्ध संपलं; कट्टर विरोधक महापालिकेत एकत्र

संदीप नाईक यांनी बंडखोरी करीत मंदा म्हात्रेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी बेलापूर मतदार संघातील माजी नगरसेवकांनी संदीप नाईक यांच्या प्रचाराचे काम केले होते.
Sarkarnama
mandatai mhatre - ganesh naiksarkarnama
Published on
Updated on

सुजीत गायकवाड

Navi Mumbai News : महापालिका निवडणुकीत आघाडी आणि युतीतील घटक पक्षातील विरोध एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहे. अशीच परिस्थिती सध्या नवी मुंबईच्या राजकारणात दिसत आहे.

नवी मुंबईत राजकारणात म्हात्रे आणि नाईक यांच्यातील शत्रुत्व जगजाहीर आहे. पण महापालिका निवडणुकीत मात्र दोन्ही नेते एकत्र प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी संकेतही दिले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी नुकताच वाशी येथे इच्छूकांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखतीसाठी भाजपतर्फे आमदार मंदा म्हात्रे, प्रभारी म्हणून नियुक्त केलेले माजी खासदार डॉ. संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.

८०० पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. यावेळी कोविडकाळापासून ते आजपर्यंत विविध पातळीवर सर्व सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. विकास कामांच्या जोरावर पालिकेत मते मागणार आहे. भाजपच्या माध्यमातूनच शहराचा विकास होणार आहे. त्यासाठी ताकदीने प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले.

Sarkarnama
Ulhasnagar Congress: महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; लहान घरांना कर मुक्तीची घोषणा

नव्या चेहऱ्यांना संधी

वनमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी बंडखोरी करीत मंदा म्हात्रेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी बेलापूर मतदार संघातील माजी नगरसेवकांनी संदीप नाईक यांच्या प्रचाराचे काम केले होते. आता तेच नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार की नवे चेहरे मैदानात उतरणार याबाबत उत्सुकता आहे.

Sarkarnama
Sharad Pawar News: धुळ्याच्या माजी महापौरांनी सोडली शरद पवारांची साथ; हाती घेतलं 'कमळ'

वाशी येथे भाजपतर्फे मुलाखतीवेळी ८५० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. प्रस्थापित चेहऱ्यांसोबतच काही प्रभागात नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न असणार आहेत. विधानसभेच्या वेळेस धावपळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

-मंदा म्हात्रे, आमदार, भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com