Navi Mumbai Municipal Corporation

नवी मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध वसवलेले शहर म्हणून ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून या शहरावर ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. नाईक आधी शिवसेनेत होते, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले आणि आता ते भाजपमध्ये स्थिरावले आहेत. नाईक राष्ट्रवादीमध्ये असताना या महानगरपालिकेवर (NMMC) राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. 2015 मध्ये 111 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागा जिंकल्या. तर शिवसेना-भाजप युतीने 44 जागा काबिज केल्या होत्या. महायुतीच्यामंदा म्हात्रे, विजय नाहटा आणि एकनाथ शिंदे यांनी नाईकांना जोरदार टक्कर दिली होती. यंदा गणेश नाईक भाजपमध्ये आले असल्याने पुन्हा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com