Vasai Virar News: वसई-विरार काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस; 26 इच्छुक मैदानात, हायकमांडसमोर मोठा पेच

Vasai-Virar Congress District President:वसई-विरार काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी 26 इच्छुकांमध्ये तुफान चुरस निर्माण झाली असून अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहे.
Vasai-Virar Congress District President
Vasai-Virar Congress District PresidentSarkarnama
Published on
Updated on

Vasai-Virar Congress News: विरार: वसई-विरार काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी यंदा चुरस पाहायला मिळत आहे. तब्बल 26 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे अखेर हायकमांड कुणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वसई-विरार जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर बदल झाला नसल्याने स्थानिक पातळीवर नाराजी वाढल्याची चर्चा आहे. सध्या हे पद अनिल आलमेडा यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षात असंतोष असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी कार्याध्यक्ष कुलदीप वर्तक, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदेश सचिव कॅप्टन निलेश पेंढारी, माजी अध्यक्ष डोमणिक डिमेलो, समीर वर्तक आणि विद्यमान अध्यक्ष ओनील आलमेडा यांच्यासह तब्बल 26 जण शर्यतीत उतरले आहेत. त्यामुळे ही निवड प्रक्रिया काँग्रेससाठी ‘डोकेदुखी’ ठरत असल्याचे चित्र आहे.

Vasai-Virar Congress District President
Maharashtra School Result 2026: आता पालकांना थेट पाहता येणार मुलांची उत्तरपत्रिका; शिक्षण आयुक्तांचा मोठा निर्णय

केंद्रीय निरीक्षक म्हणून तेलंगणाचे बेला नायक वसईत दाखल झाले होते. त्यांनी सर्व इच्छुकांची मुलाखत घेतली असून आता 26 जणांमधून 2 ते 3 नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवली जाणार आहेत. अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याने स्थानिक समीकरणांना किती महत्त्व दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Vasai-Virar Congress District President
BJP News: भाजप कार्यालयात चहा करणारा झाला नगरसेवक! मोदींच्या होमटाऊनमध्ये विरोधकांना पाजलं पाणी; VIDEO पाहा

आता मोठा प्रश्न असा की, काँग्रेस हायकमांड वसई-विरारमध्ये बदलाचा ‘धडाका’ उडवणार की पुन्हा एकदा जुन्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणार? या निर्णयावर आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com