अजितदादांचे भाजपला धक्क्यामागून धक्के : तिसरे बारणे राष्ट्रवादीत दाखल

भाजपचे संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
Ajit Pawar-Sambhaji Barne
Ajit Pawar-Sambhaji BarneSarkarnama

पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक पाच महिन्यांवर आल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय फोडाफोडी जोरात सुरु झाली आहे. भाजपचे तीन शिलेदार राष्ट्रवादीने गुरुवारी (ता. २३ सप्टेंबर) फोडले. त्यानंतर २४ तासांत आज (ता. २४) भाजपचाच आणखी एक मोहरा त्यांनी टिपला. दरम्यान, येत्या काही दिवसांत इनकमिंग,आऊटगोईंग आणखी जोरात सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. (BJP's Sambhaji Barne joins NCP)

दरम्यान, बारणेंची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची या महिन्यातील आगळी हॅटट्रिक शहरात झाली आहे. भाजपच्या नगरसेविका माया बारणेंचे पती व माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी प्रथम ९ तारखेला कमळ सोडले आणि हातावर घड्याळ बांधले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे या दुसऱ्या बारणेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.तर, आज पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य भाजपचे संभाजी बारणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तीनही बारणेंचे प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाले आहेत. हे तिघेही शहराच्या थेरगाव भागातील आहेत.

Ajit Pawar-Sambhaji Barne
ZP उमेदवारीसाठी सरपंच-उपसरपंचांचा राजीनामा; राष्ट्रवादीवर निवडणुकीपूर्वीच दबाव

पिंपरी पालिकेची २०१७ ला हातातून निसटलेली सत्ता परत मिळवण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट असलेल्यांचा सध्या ते प्रवेश घडवून आणत आहेत. या फोडाफोडीत वर्षअखेरीस भाजप नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीत येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पालिकेतील त्यांचा एक नेता पक्षात येणार असल्याचा दावा कालच राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. कालच शहर कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक समर्थक आणि मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, शहराचे दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा तरुण कार्यकर्ता ज्ञानेश्वर बोराडे आणि भाजपचा प्रदेश पातळीवरील आदिवासी पदाधिकारी विष्णू शेळकेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.त्यानंतर आज संभाजी बारणेंनी भाजपला सोडून राष्ट्रवादीशी जवळीक केली.

Ajit Pawar-Sambhaji Barne
भाच्यासाठी मामा आला धावून : हर्षवर्धन पाटील-शहा कुटुंबीयांत घडविले मनोमिलन

दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेचे चार, तर राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक येत्या आठ दिवसांत पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. एकूणच येत्या काही दिवसांत इनकमिंग आणि आऊटगोईंग मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत आज प्रवेश केलेल्या संभाजी बारणेंना गतवेळी २०१७ ला थेरगावमधून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.

दरम्यान, बारणेंच्या या प्रवेशांमुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे राहत असलेल्या थेरगाव भागात राष्ट्रवादीची ताकद वाढत चालली आहे. त्यात त्यांचा उजवा हात समजले जाणारे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनीही शिवसेनेला नुकताच (ता. २२ सप्टेंबर) जय महाराष्ट्र करीत हाती कमळ घेतले. बारणेंचे कट्टर राजकीय शत्रू आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडेंना भाजपमध्ये आणले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com