भाच्यासाठी मामा आला धावून : हर्षवर्धन पाटील-शहा कुटुंबीयांत घडविले मनोमिलन

संस्थेत त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल. तसेच, त्यांच्या अधिकारावर कुठलेही गंडांतर येणार नाही
Bharat Shah filling up the candidature application for Karmayogi Sugar factory
Bharat Shah filling up the candidature application for Karmayogi Sugar factorySarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : गेल्या काही महिन्यांपासून माजी सहकार मंत्री आणि कर्मयोगी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकूळदास शहा यांच्यात इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळावरून राजकीय मतभेद निर्माण झाले होते. अखेर आज पुणे जिल्हा बँकेचे संचालक आणि पाटील यांचे मामा आप्पासाहेब जगदाळे यांनी या दोघांमधील मतभेद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. हर्षवर्धन पाटील यांनीही शहा कुटुंबांचा मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली, त्यानंतर शहा गटाकडून भरत शहा यांनी कर्मयोगीसाठी अर्ज दाखल केला. (Disagreements between Harshvardhan Patil-Shah family finally settled)

दरम्यान, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकार कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी मंत्री पाटील हे पुन्हा एकदा कारखान्यावर वर्चस्व राखणार हे आता सिद्ध झाले आहे. कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकूळदास शहा यांचे पुतणे, कारखान्याचे विद्यमान संचालक तथा इंदापूर बँकेचे माजी अध्यक्ष भरत शहा यांनी ऊसउत्पादक गटातून तहसीलदार श्रीकांत पाटील, सहायक निबंधक जिजाबा गावडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या पॅनेलचा विजय आणखी सोपा झाला आहे.

Bharat Shah filling up the candidature application for Karmayogi Sugar factory
ZP उमेदवारीसाठी सरपंच-उपसरपंचांचा राजीनामा; राष्ट्रवादीवर निवडणुकीपूर्वीच दबाव

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही आमची संस्था आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे खंदे सहकारी गोकुळदास शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर आम्हाला गोकुळदास शहा हे दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांच्या स्थानी असून मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही. शहा, त्यांचे चिरंजीव तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, त्यांच्या सूनबाई तथा नगराध्यक्षा अंकिता शहा, पुतणे तथा इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भरत शहा यांचे योगदान मोठे आहे. संस्थेत त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल. तसेच, त्यांच्या अधिकारावर कुठलेही गंडांतर येणार नाही, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. त्यानंतर पाटील आणि शहा यांच्यातील दुरावा संपला.

Bharat Shah filling up the candidature application for Karmayogi Sugar factory
अशी शिक्षा करा की महिलेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी दाखवू नये

मुकुंद शहा व भरत शहा या बंधूंनी इंदापूर दूध संघाच्या कार्यालयात जाऊन पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. भरत शहा यांनी एप्रिल महिन्यामध्ये इतरांना संधी हे कारण पुढे करून विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यावर पाटील यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया न दिल्याने यामध्ये राजकारण दडल्याची चर्चा होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहा कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. होती. त्यावेळी त्यांनी शहा कुटुंबीयांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु शहा कुटुंब हे पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे.

या वेळी ॲड. शरद जामदार, ॲड. कृष्णाजी यादव, माऊली चवरे, रघुनाथ राऊत, देवराज जाधव, शकील सय्यद, महेंद्र रेडके, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, दत्ता पांढरे, अरशाद सय्यद, अंगद शहा, राहुल जवंजाळ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com